नांदेड ता. धरणगाव (दीपक भोई) गावातील दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
या संदर्भात अधिक असे की, गावातील गावठाण चौकातील रामदास कोळी यांचे कृष्णा किराणा आणि भास्कर नारखेडे यांच्या मालकीचे नारखेडे कृषी केंद्र अशी दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी रात्री फोडली आहेत. यात चोरट्यांनी कृष्णा किरणा दुकानातून ३ ते ४ हजाराची चिल्लर तसेच साधारण ५० हजाराचा किराणा माल चोरून नेलाय. दुसरीकडे नारखेडे कृषी केंद्रातून साधारण १५ हजाराची रोकड लंपास केलीय. परंतू चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दरम्यान, गावातील मुख्य चौकात चोरी झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.