धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील तलाठी बालाजी लोंढे पाळधी बु व सुमित गवई तलाठी चांदसर यांना प्रांताधिकारी एरंडोल विनय गोसावी यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत.
यात नागरिक व शेतकरी यांना न्याय न देणे, मुख्यालयी न थांबणे, अतिवृष्टी याद्यामध्ये नावे वगळणे, शेतकरी व नागरिकांना फिरवणे, 7।12 साठी धरणगावला बोलावणे अशा अनेक तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांच्या असल्यामुळे चौकशीअंती त्यांचा अहवाल तहसिलदार धरणगाव यांनी पाठविला होता. यात तलाठी पाळधी बालाजी लोंढे यांचा असमाधानकारक नसल्याने तसेच तलाठी चांदसर यांनी खुलासा सादर न केल्यामुळे सदर निलंबन कारवाई त्यांच्यावर प्रांताधिकारी यांचेकडून करण्यात आली आहे.
एस. डी. गवई, तलाठी चांदसर बु यांना तलाठी या पदावरून तात्काळ निलंबीन करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ८ नुसार विभागीय चौकशी सुरू करीत आहे. तहसिलदार धरणगाव यांनी १५ दिवसात परिशिष्ट १ ते ४ कागदपत्रांसह सादर करावे. एस.डी.गवई, तलाठी चांदसर यांचे निलंबित कालावधीमध्ये मुख्यालय तहसिल कार्यालय पारोळा हे राहिल. तसेच त्यांना तहसिलदार पारोळा यांचे पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. एस.डी. गवई, तलाठी चांदसर यांचे देय असलेले निर्वाह भत्ता बाबतचे आदेश स्वतंत्ररित्या पारित करण्यात येतील, असे एरंडोल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी आदेशित केले आहे.