यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी गावी जात असताना मोटारसायकल व ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना (दि.१९ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीतीनुसार, सुमारास साकळी बस स्थानक ते गावापर्यंतच्या मार्गावरील रस्त्यावर पिरबाबाच्या दर्गाजवळ यावल हुन किनगावकडे जाणाऱ्या बॉक्सर कंपनीच्या मोटारसायकल (क्रमांक एमएच १८पी२२६७) आणि साकळी कडुन यावलकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच १९ सियु३०६६) यांच्या अपघात होवुन किनगाव येथील राहणारा युवक रहीमशाह नुर शाह (वय-२३) तर दुसरा नदीम रहेमान पिंजारी (वय१८) वर्ष राहणार किनगाव हे दोघ तरूण जखमी झाले असुन यातील रहीमशाह या तरूणाच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातातील दोघ जखमींना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणुन वैद्यकीय अधिकारी डॉ .बी.बी.बारेला यांनी प्राथमिक उपचार केल्यावर रहीमशाह या युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरीता जळगाव येथे पाठविण्यात आले असुन, यावल पोलिसांनी अपघातातील ट्रकसह मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. दरम्यान, नदीम रहेमान पिंजारी यांनी पोलीसात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.