चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील न्यायालयासमोर असलेल्या रिक्षा स्टॅन्ड येथून एका रिक्षातून अज्ञात चोरट्याने भरदिवसा मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दीपक मधुकर पाटील (वय ४२, रा. पाण्याच्या टाकीजवळ भोसर, ता चाळीसगाव) यांचा रेड मी कंपनीचा काळ्या व निळ्या रंगाचा जु.वा.की. अं. त्यात जिओकंपनिचे सिम कार्डक्र. ९३५९६६९६३७ हा मोबाईल चाळीसगाव शहरातील न्यायालयासमोर असलेल्या रिक्षा स्टॅन्ड येथून रिक्षातून चोरून नेला. याप्रकरणी दीपक मधुकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुरन ५७/२०२२ भादवी कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना राहुल भीमराव सोनवणे करीत आहेत.