TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता !

टाईम्स शिल्डने करिअर घडवण्यात अमूल्य भूमिका बजावली : प्रवीण आमरे !

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने मुंबई कस्टमवर मात करत भारतातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या टाईम्स शिल्ड क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. यात जैन इरिगेशनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सुवेद पारकर ठरला होता. मुंबई येथे टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ९३ व्या वार्षिक पारितोषिक वितरणाप्रसंगी भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे, प्रो. रत्नाकर शेट्टी, श्री व्यंकट (टाइम्स) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जैन इरिगेशनच्या संघाला टाईम्स शिल्ड २०२३-२४ ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाचे मयंक पारेख, शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांबवेकर, आयुष झिमरे, मयूर ढोलकिया यांनी हा सन्मान स्वीकारला. वानखेडे स्टेडियममधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लाउंजमध्ये हा समारंभ पार पडला.

जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कमिटीचे सदस्य अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

यावेळी प्रमूख अतिथी भारताचे माजी कसोटीपटु प्रवीण आमरे यांनी टाइम्स शील्डमधील सहा विभागांमधील कॉर्पोरेट सहभागाचे मूल्य अधोरेखित केले. माझे गुरू रमाकांत आचरेकर मला नेहमी सांगायचे की, ‘एका नोकरीमुळे क्रिकेटपटूच्या कुटुंबाची काळजी घेतली जाऊ शकते.’ ते माझ्यासाठी खरे ठरले. मी १५ वर्षांपासून आयपीएलमध्ये सहभागी झालो असलो तरीही, मला विश्वास आहे की क्रिकेटपटूंसाठी नोकरी आवश्यक आहे, कारण ते फक्त तीन वर्षे खेळले आहेत माझ्या एअर इंडियाच्या नोकरीसाठी, मी आज आहे तसाच आहे. असे प्रवीण आमरे म्हणाले.

प्रवीण आमरे, यांनी आपल्या कारकिर्दीत खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि प्रशासक या भूमिका निभावल्या आहेत, टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे मुंबई क्रिकेटमध्ये विशेष स्थान आहे. मुंबईने ४२ वेळा रणजी जिंकली आहे, आणि टाईम्स शिल्डने क्रिकेट स्पर्धेचे यातील सहभागी खेळाडूंचे करिअर घडवण्यात अमूल्य भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेने ‘सी’ डिव्हिजनमध्ये सुरुवात केली, व मला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली त्यानंतर वासू परांजपे यांनी मला एअर इंडियाचे कर्णधारपद देऊ केले, ज्यामुळे मला स्पर्धा करणारा संघ तयार करता आला, मला अभिमान आहे की माझा हा संघ ३२ वर्षे ‘ए’ डिव्हिजन मध्ये सातत्याने खेळला आहे. जैन इरिगेशनचे संघ या स्पर्धेत चांगली प्रगती करीत आहे व त्यामुळेच त्यांचा संघ विजेता ठरला आहे. जैन इरिगेशन संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांनी भविष्यातील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

विभाग ‘ए’ चा निकाल
विभाग ‘ए’ मध्ये जैन इरिगेशन विजयी तर मुंबई कस्टम उपविजयी झालेत, यात सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून जैन इरिगेशनचा सुवेद पारकर ठरला तर मुंबई कस्टमच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाज ध्रुमिल मतकर ठरला, ‘ए’ विभागात सर्वाधिक जलद धावसंख्या करणारा संघ डी वाय पाटील ठरला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJain irrigation

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

५० हजार जनतेच्या उपस्थितीत आणि लाडक्या बहिणींच्या हस्ते भरणार आ.मंगेश चव्हाण विधानसभा उमेदवारी अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाच हजारांची लाच भोवली ; चोपडा तालुक्यातील ग्रामसेवक जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

February 1, 2024

साळवा ते पष्टाणे रस्त्याचे डांबरीकरणच्या काम लवकरच मंजूर करणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 26, 2022

खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा तालुक्यात समाजपयोगी कार्यक्रम उत्साहात !

November 25, 2022

Government introduces new rules for public university admission

August 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group