TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विलासराव देशमुख अभय योजनेचा तीन लाख वीजग्राहकांना होणार लाभ !

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना दिलासा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केली आहे. खान्देशात अशा ग्राहकांची संख्या तीन लाख असून त्यांनी थकीत वीजबिल भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

या योजनेमुळे प्रामुख्याने व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना पुन्हा सुरू होऊन मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल यामुळे राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल. कोरोनाकाळात कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या उद्योग-व्यवसायांना दिलासा देणारी ही योजना आहे. या ग्राहकांना योजनेत थकबाकी भरून पुन्हा आपले उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या योजनेचा कालावधी 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. 31 डिसेंबर 2021 पूर्वी वीजपुरवठा खंडित कायमस्वरूपी झालेल्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येइल. या योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात येणार आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के तर लघुदाब ग्राहकांना 10 टक्के थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळणार आहे. या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे परंतु त्यासाठी मुद्दलाच्या 30 टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरीत रक्कम 6 हप्त्यात भरता येईल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

योजनेच्या लाभार्थी ग्राहकाने हप्त्यांची उर्वरित रक्कम भरली नाही तर माफ केलेली व्याज व विलंब आकाराची रक्कम वीजबिलात पूर्ववत लागू करण्यात येणार आहे. महावितरणने थकबाकीच्या रक्कम वसुलीसाठी कोर्टात दावा दाखल केला असेल व ग्राहकांना योजनेतील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रिया खर्च) देणे अत्यावश्यक राहील. जर ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजपुरवठा सध्या आहे त्याच ठिकाणी पुन्हा सुरू करायचा झाल्यास महावितरण वीजपुरवठा सुरू करेल, परंतु जर ग्राहकाला नवीन वीजजोडणी घ्यायची असल्यास नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क व अनामत रक्कम यांचा भरणा करावा लागेल. ज्या ग्राहकाला हप्त्याने थकीत रक्कम भरावयाची असेल अशा ग्राहकाने वीज जोडणी चालू केल्यावर चालू बिलाच्या रकमेसोबत ठरवून दिलेल्या हप्त्याची रक्कम भरणे अनिवार्य असेल. ज्या ठिकाणी महावितरणच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिलेला असेल व 12 वर्षाच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकाने कोठेही अपील केले नसेल तर अशा ग्राहकांनाही या योजनेचा फायदा घेता येईल. ज्या ग्राहकांचा वाद न्यायालयात चालू असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

खान्देशात डिसेंबर-2021 अखेर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांची संख्या 3 लाख 1 हजार 783 एवढी असून त्यांच्याकडे 319 कोटी 65 लाख रुपयांची थकबाकी आहे. जळगाव जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 880 ग्राहकांकडे 207.40 कोटी, धुळे जिल्ह्यात 70 हजार 20 ग्राहकांकडे 51.06 कोटी तर नंदुरबार जिल्ह्यात 64 हजार 883 ग्राहकांकडे 61.19 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या योजनेचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा ; शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘१२ आमदार तालिबानी किंवा गुंड नाहीत’ ; संजय राऊतांचा टोमणा

September 2, 2021

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्कमध्ये मतदान जनजागृती !

May 9, 2024

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 17, 2021

जळगावातील भोलेनाथ कंपनीत चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

February 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group