TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १३ ते १९ नोव्हेंबर २००२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जी कामे हाती घ्याल त्यात यश मिळेल, तेव्हा आता उशीर करून चालणार नाही. व्यवसायात एकाच दगडात दोन पक्षी मारावे असा डाव साध्य होईल. म्हणजे दोन कामांमधून एकाच वेळी फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल, त्यामुळे काम करणे सोपे जाईल. आर्थिक सुबत्ता येईल. समाजसेवेची संधी निर्माण होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होईल. उपासनेत मन रमेल. मानसिक समाधान मिळेल.

वृषभ : जी कामे बाकी ठेवलेली आहेत या सप्ताहात पूर्ण करून घ्या. इतरांचे मार्गदर्शनही मिळेल. व्यवसायात अनपेक्षित लाभ होतील. प्रत्येक काम हुशारीने कराल. नोकरदार वर्गाच्या कामामध्ये नियमावलीचे पालन करावे लागेल. मात्र ही नियमावली कामाचे तास कमी करणारी असेल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. मित्रांकडून गोड बातमी कळेल. वास्तूसंदर्भात महत्त्वाचे करार होतील. अध्यात्माची आवड निर्माण होईल.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : बऱ्याच दिवसांपासून कालावधी चढ-उताराचाच असायचा. असा एकही सप्ताह नव्हता की ज्यामध्ये एखादा दिवस खराब नाही. सध्या मात्र सगळे दिवस चांगले आहेत. तर अशा या कालावधीत हाताबाहेर गेलेल्या गोष्टी आवाक्यात येतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. खर्च कमी होईल. सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. कुटुंब हसते-खेळते राहील. धार्मिक गोष्टींमध्ये रममाण व्हाल. मानसिक समाधान लाभेल.

कर्क : कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. सकारात्मक बदल घडेल. स्वत:च्या कर्तृत्वावर अनेक गोष्टी साध्य होतील. व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारातून मोठय़ा प्रमाणात नफा होईल. नवीन प्रस्ताव फायदेशीर ठरतील.नोकरदार वर्गाची कामामध्ये असलेली जबाबदारी पार पडेल. आर्थिक अडथळा कमी होईल. राजकीय क्षेत्रात स्वत:हून पुढाकार घेऊन कामे हातासरशी पूर्ण कराल. कुटुंबासाठी वेळ द्याल. भावंडांच्या गरजा भागवाल.

सिंह : कायदा क्षेत्रात नियमांचे पालन करा. इतरांचे मत ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. त्यामुळे वादविवाद वाढणार नाही. हे तीन दिवस सोडून बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायात वनस्पतीजन्य मालाची साठवणूक प्रमाणापेक्षा जास्त करणे त्रासाचे होईल. तोंडी व्यवहार टाळा. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. दिनांक १४, १५, १६ असा हा तीन दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत आपला ज्या व्यक्तीशी, ज्या गोष्टीशी काहीही संबंध नाही अशा गोष्टींमध्ये पडू नका.

कन्या : व्यवसायात अनेक नव्या गोष्टी शिकावयास मिळतील. परिस्थितीनुसार बदल करणे इष्ट राहील.नवीन भागीदारी टाळा. नोकरदार वर्गाला नियोजनानुसार काम करावे लागेल. खर्च कमी करा. समाजसेवा केल्याचा आनंद मिळेल.दिनांक १७, १८ रोजी जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. प्रत्येक गोष्ट सतर्कता बाळगून करावी लागेल. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. या दोन दिवसांचा कालावधी सोडल्यानंतर बाकी दिवस चांगले असतील.

तूळ : सध्या कोणत्याही गोष्टीसाठी धावपळ करावी लागणार नाही. प्रत्येक गोष्ट ही वेळेत होऊ लागेल. ज्या कामासाठी इतराचे सहकार्य लागत होते, पण ते मिळत नव्हते ते सहकार्य मिळणार आहे. ज्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचा हुरूप वाटत नव्हता तो वाटेल. रोखीचे व्यवहार होतील. नोकरदार वर्गाची कार्यक्षमता उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. मित्रांमार्फत आलेला प्रस्ताव स्वीकारा. तो आगामी काळासाठी फायद्याचा ठरेल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभाग राहील.

वृश्चिक : ठरवलेल्या नवीन ध्येयापर्यंत पोहोचण्यास आता उशीर लागणार नाही. कोणत्याही कामाविषयी दडपण वाटणार नाही. खडतर प्रवास कमी होईल. गोष्टी मनासारख्या घडू लागतील. त्यामुळे उत्साह वाढेल. व्यवसायात अनपेक्षित असा लाभ होईल. इतरांचे सहकार्य मिळेल. नवीन व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी दिवस चांगले असतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा उत्तम राहील. आर्थिक बाबतीत भरभराट होईल. राजकीय क्षेत्रात पदार्पण कराल. भावंडाशी जपून संवाद करा.

धनू : व्यवसायात धावपळ वाढेल. त्यासाठी नियोजनानुसार हालचाली करा. उधारीचे व्यवहार करणे टाळा. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. मागील कमतरता भरून निघेल. आर्थिकदृष्टय़ा मदत मिळेल. राजकीय क्षेत्रात न झेपणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. दिनांक १४, १५, १६ हे तीन दिवस चंद्र ग्रहाची अनुकूलता नसल्यामुळे कोणतेही काम विचारपूर्वक करावे लागेल. आपल्याला ज्या गोष्टीविषयी माहिती नाही. त्या विषयासंदर्भात इतरांना सल्ला देऊ नका. हे तीन दिवस प्रत्येक गोष्ट जपून करावी लागेल. त्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा राहील. बाकी दिवस चांगले जातील.

मकर : कारण नसताना एखाद्या गोष्टीचा मनस्ताप होऊ शकतो. मात्र त्याच्या किती आहारी जायचे हे तुमच्याच हाती असेल. तेव्हा कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीत ढवळाढवळ करू नका. एखादी गोष्ट मनाला पटली नाही तरीसुद्धा ती पटवून घ्यावी लागेल असेच ग्रहमान आहे असे समजा. व्यवसायातील धाडसी निर्णय टाळा. व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिक बाबतीत खर्चाचे ताळतंत्र बिघडू देऊ नका. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा.

कुंभ : स्वत:ची जबाबदारी इतरांवर टाकून नुकसान करून घेऊ नका. त्यासाठी नियोजनपूर्वक गोष्टी हाताळाव्या लागतील. व्यवसायात जे आणि जसे चालले आहे ते ठीकच आहे असे समजून पुढे जा. त्यात कोणतीही नवीन उलाढाल करू नका. भागीदारी व्यावसायिकांनी हिशोबाच्या नोंदी ठेवा. नोकरदार वर्गाचे कामात लक्ष लागणार नाही. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. या आठवडय़ातील सर्वच दिवस चढउताराचे राहणार आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही. कोणत्याही कामात घाई गडबड करणे त्रासाचे राहील.

मीन : भांडण वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. बोलण्याच्या ओघात बोलून गेलो असे म्हणून चालणार नाही. तेव्हा शांत राहूनच सर्व गोष्टी कराव्या लागतील. बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. अनोळख्या व्यक्तींपासून सावध राहा. नोकरदार वर्गाला महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आर्थिकदृष्टय़ा काटकसर करा. समाजमाध्यमांचा उपयोग करून घ्याल. दिनांक १७, १८ असे हे दोन दिवस कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी शांत राहावे असे वाटणार नाही. त्यासाठी तोंडावर ताबा ठेवणे आवश्यक राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढल्यास लाखों लोक बेघर होतील : खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला ; पाचव्या फेरीअखेर आंध्राचा इम्रान तर महाराष्ट्राची संनिद्धी भट आघाडीवर !

December 30, 2023

सतखेडा येथील बालकाचा अंजनी नदीपात्रात बुडून मृत्यू !

August 10, 2024

ब्रेकिंग न्यूज : जळगाव दुध संघाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; पोलिसांकडून मध्यरात्री गुन्हा दाखल !

October 17, 2022

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला निघाले, अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू !

March 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group