TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र येत्या निवडणुकीत बाजारबुणग्यांना संपवेल : उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका !

vijay waghmare by vijay waghmare
September 26, 2024
in राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राबाहेरील बाजारबुणग्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची भाषा करू नये. हिंमत असेल, तर महाराष्ट्रात लढून दाखवावे, असे थेट आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे माजी सरचिटणीस दिनेश परदेशी यांच्यासह मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत हाताला शिवबंधन बांधून शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला.

विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीवर भर दिला आहे. शाह यांनी मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यांत मार्गदर्शन केले. ‘येत्या निवडणुकीत पहिले टार्गेट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष असल्या’ चे त्यांनी तेथे जाहीर केले. त्याला ठाकरे यांनी बुधवारी उत्तर दिले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

‘गेल्या आठवड्यात परदेशी भेटून गेले होते. आता ते भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आले आहेत. त्यामुळे मला भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्यात सुरू झालेला भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? हिंदुत्वाच्या नावावर भाजपच्या लोकांनी थोतांड माजवले आहे. माझे हिंदुत्व वेगळे आहे,’ असे सांगून ठाकरे यांनी शाह यांचा समाचार घेतला. त्यांचे भाषण मी ऐकले नाही, परंतु या बाजारबुणग्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे. त्यांना कल्पना नाही, हा वीरांचा महाराष्ट्र आहे.

‘बाजारबुणगे’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आहे. या बाहेरील बाजारबुणग्यांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करू नये. त्यांच्यात हिंमत असेल, तर महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढवून आम्हाला संपवून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र बाजारबुणग्यांना पुरून उरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Maharashtra will end market stalls in the upcoming elections: Uddhav Thackeray's harsh criticism!Mumbai

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
जळगाव

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

June 19, 2026
जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
Next Post

तो एन्काऊंटर असू शकत नाही : मुंबई उच्च न्यायालय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोहाडी कोव्हीड सेंटर भ्रष्टाचार प्रकरण : शैक्षणिक अर्हता नसलेले कर्मचारी नियुक्त? ; माहिती देण्यास टाळाटाळ !

September 29, 2022

मोठी बातमी : धरणगावात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा ; चार आरोपींना अटक !

January 23, 2022

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : आमदार संजय सावकारे विजयी !

November 22, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २४ जून २०२३ !

June 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group