TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 ऑक्टोबर 2022 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आता चांगल्या गोष्टी करण्यासाठी उशीर लावू नका. त्याचा श्रीगणेशा लवकरच करा. विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी कराल. नवीन दालनाचा शुभारंभ होईल. व्यावसायिक भरभराट होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक पाठबळ वाढेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. मित्र-मैत्रिणींशी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा कराल.

वृषभ : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर छोटय़ाशा खरेदीचे का होईना स्वप्न पूर्ण होईल. सप्ताह आनंदाचा जाईल. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती गती घेईल. एकाच गोष्टीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. अनेक माध्यमांतून लाभ मिळेल. नोकरदार वर्गाला निर्माण झालेल्या प्रश्नावर मार्ग मिळेल. आर्थिक भरभराट होईल. दिनांक २ व ३ हे दोन दिवस प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. कोणीही हूल देऊन फसवण्याचा प्रयत्न केला तरी फसू नका. महत्त्वाचे निर्णय या दोन दिवसांत टाळा. बाकी दिवस चांगले जातील

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : विजयादशमी- दसरा हा शुभ मुहूर्त असला तरी फार मोठय़ा वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरा. दसऱ्याचा दिवस कसा आनंदी जाईल यासाठी प्रयत्न करा. व्यवसायात नियोजनाला महत्त्व दिल्यास फायद्याचे प्रमाण वाढेल. उधारीचा व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाच्या मागण्या वरिष्ठांना मान्य कराव्या लागतील. आर्थिक व्यवहार जपून करा. जिथे गरज असेल अशाच ठिकाणी समाजसेवा करण्याचा निर्णय घ्या. दिनांक ४, ५ या दिवशी महत्त्वाचे करार करणे टाळा. स्वत:च्या हाताने स्वत:च नुकसान करून घेऊ नका. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवस चांगले जातील.

कर्क : आर्थिक बाजू भक्कम करा. राजकीय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता राहणार नाही.चंद्र ग्रहाचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. अशा स्थितीत कोणतेही कसेही निर्णय घेऊन चालणार नाही. बोलताना भान ठेवा. इतरांचा सल्ला ऐकून घ्या. त्यावर प्रतिउत्तर करू नका. क्रोधावर नियंत्रण ठेवा. दिनांक ४ आणि ५ हे दोन दिवस सोडले तर बाकी दिवस सतर्क राहा. दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताचा दिवस मात्र आनंदात जाईल. व्यवसायात अनोळख्या व्यक्तींपासून लांब राहा. व्यवहाराचे गणित इतरांच्या हाती देऊ नका. हिशोबाची नोंद ठेवा. नोकरदार वर्गाने कोणतेही काम वरिष्ठांना विश्वासात घेतल्याशिवाय करू नका.

सिंह : आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगत बसू नका. त्यामुळे गैरसमज वाढू लागतील. जिथे वादविवाद होणार आहे असे संकेत दिसू लागतील अशा ठिकाणी शांत राहा. घाईने कोणतीही कृती करू नका. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एखादी खरेदी नाही केली तरी चालेल; पण तो दिवस मात्र आनंदाने साजरा करा. व्यवसायात जे आणि जसे चालले आहे तसेच स्वीकारा. फार मोठी गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाने मागील कामाचा अनुभव विसरून चालणार नाही. आर्थिक टंचाई भासणार नाही याची तरतूद करा.

कन्या : विजयादशमी- दसरा मोठय़ा उत्साहाने साजरा करा. खरेदीचा बेत पूर्ण होईल. व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारातून चांगला नफा होईल. नवीन प्रस्ताव फायदेशीर असतील. नोकरदार वर्गाने इतरांना सोबत घेऊन आपले विचार मांडण्यापेक्षा स्वतंत्र विचार मांडा. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. समाजमाध्यमांचा वापर योग्य पद्धतीने करा. दिनांक ६, ७ रोजी ध्यानीमनी नसताना एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते. त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत स्पष्ट बोलण्याने स्वत:लाही व इतरांनाही त्रास होऊ शकतो. तेव्हा हे दोन दिवस शांत राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.

तूळ : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मनसुबे पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. बाजारपेठेतील परिस्थितीचा अंदाज अचूक येईल. व्यवसायात स्थिरता प्राप्त होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. मात्र वरिष्ठांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. समाजसेवेची आवड राहील. धार्मिक गोष्टीतील उत्साह टिकून राहील. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. मानसिक ताण कमी होईल. प्रकृती उत्तम राहील. सप्ताहातील सर्व दिवस उत्तम असतील. कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. सहजासहजी कामे होत राहतील.

वृश्चिक : सध्या सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे चांगल्या कामाला सुरुवात होईल. स्वत:चे अस्तित्व स्वत: निर्माण कराल. इतरांचे मार्गदर्शन मिळेल. पर्यायी गोष्टी आता स्वीकाराव्या लागणार नाहीत. घेतलेले निर्णय योग्य असतील. विजयादशमी- दसऱ्यानिमित्त फार दिवसापासून जे स्वप्न रंगवत होता ते पूर्ण होणार आहे. मोठी खरेदी होईल. व्यवसायात जाहिरात माध्यमांचा प्रभाव उत्तम पडेल. आवकजावक वाढेल. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल. नोकरदार वर्गाला बढतीची चाहूल लागेल. आर्थिकदृष्टय़ा सफलता मिळेल.

धनू : मागील काही दिवसांपेक्षा हा आठवडा मात्र चांगला जाईल. दमदार वाटचाल राहील. नवी दिशा मिळेल. महत्त्वाचे निर्णय वेळेत घेतले जातील. इतरांशी केलेली चर्चा फलदायी ठरेल. प्रगतीचा आलेख उंचावता राहील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. व्यवसायात यशस्वी भरारी माराल. स्वतंत्र व्यवसायाला चालना मिळेल. व्यवसायासाठी काढलेले कर्ज फेडाल. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. आर्थिकदृष्टय़ा लाभ होईल.

मकर : दिनांक २, ३ रोजी जबाबदारीने काम करावे लागेल. भावनिक गोष्टीत गुंतून चालणार नाही. व्यावहारिक गोष्टींना महत्त्व द्या. इतरांना दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न करा. भडक बोलणे टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधून मनसोक्त खरेदीचे स्वप्न पूर्ण कराल. आनंदीमय वातावरण निर्माण होईल. व्यवसायात कोणतीही गुंतवणूक करताना परिस्थितीचा अंदाज घ्या. त्यानुसारच निर्णय घ्या. रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. नोकरदार वर्गाने काम करताना गोंधळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात वेळेवर निर्णय घ्या. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क साधाल.

कुंभ : एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याच्या मागे लागू नका. त्यातून काहीच साध्य होणार नाही. शब्द जपून वापरा. नम्रता हा गुण अंगी बाणा. बाकी दिवस चांगले जातील. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनावश्यक गोष्टींचा खर्च टाळा. व्यवसायात नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. इतरांच्या सल्ल्याने निर्णय घेणे टाळा. भागीदारी व्यवसायात चाललेल्या घडामोडीत बदल होईल. दिनांक ४, ५ हा दोन दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नाही. तेव्हा या दोन दिवसांत कोणाच्याही आहारी जाऊ नका. नियमबाह्य गोष्टी टाळा. कायद्याचे पालन करा.

मीन : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जोडीदाराकडून आकर्षक भेटवस्तूंचा लाभ होईल. व्यवसायात जितका व्याप वाढेल तितकी जबाबदारीही वाढेल. ही जबाबदारी पार पडताना मात्र धावपळ होईल. धावपळ जरी वाढली तरी फायदाही चांगला राहील. आर्थिकदृष्टय़ा रोखठोक व्यवहार करा. राजकीय क्षेत्रात सामूहिक गोष्टींवर चर्चा करावी लागेल. क्षुल्लक कारणावरून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. मुलांचा हट्ट पूर्ण कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दिनांक ६, ७ रोजी भूलथापांना बळी पडू नका. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत मध्यस्थी करायला जाऊ नका. त्याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो. या दोन दिवसांत महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

धक्कादायक : अल्पवयीन तरुणाच्या अत्याचारातून १९ वर्षीय तरुणी गर्भवती ; यावल पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

October 18, 2021

शेअर खरेदीच्या नावाने अमळनेरच्या तरुणाला सात लाखात गंडविले !

October 17, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २६ नोव्हेंबर २०२४ !

November 26, 2024

देशात गेल्या २४ तासांत आढळले २५,०७२ कोरोनाबाधित, ३८९ रुग्णांचा मृत्यू

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group