मेष : वक्री स्थितीतील शनीचं भ्रमण कृतिका नक्षत्रास व्यावसायिक पार्श्वभूमीवर आचारसंहिता लावत आहे. कोणताही शॉर्टकट नको. बेकायदा भूमिसंपादन नको. नोकरीत वरिष्ठांना जपा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ या दिवसांत गुरुभ्रमणाचं गुप्त सहकार्य राहील. मात्र, सप्ताहाचा शेवट अपघातजन्य. शुभ दिनांक : २६, २८
वृषभ : सप्ताहात शुभग्रहांची मंत्रालयं आपणास निश्चितच सहकार्य करतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती जनसामान्यांत प्रभाव टाकतील. उत्तम वसुली होईल. कृत्तिका नक्षत्राचा शैक्षणिक भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रसंगतीतून चिंता, कुसंगत टाळा. घरात आई-वडिलांची मनं जपा. नोकरीत नमतं घ्या. शुभ दिनांक : २४, २८
मिथुन : शुभग्रहांची लॉबी प्रभावीच राहील. व्यावसायिक तेजी राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींवर धनवर्षाव. ता. २७ व २८ हे दिवस आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय सुसंगत. सतत ग्रीन सिग्नल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाचा शेवट क्रिया-प्रतिक्रियांतून जपावा. ता. २१ व २२ हे दिवस वाद वाढवणारे. शुभ दिनांक : २६, २७
कर्क : सप्ताह फलंदाजीचा नाहीच, आहे ते जपा, ते मिळवण्यासारखंच आहे. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २७ हे दिवस ग्रहयोगांतून अपवादात्मकच, कोणताही आग्रह किंवा अट्टहास नको. बाकी पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना काहीही न बोलता अकल्पित लाभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय. शुभ दिनांक : २४, २८
सिंह : वक्री शनीची आचारसंहिता पाळावीच लागेल. कामगारांची मनं सांभाळा. रस्त्यावरील कुत्र्यांपासून जपा. वाहतुकीचे नियम पाळा. बाकी शुक्रभ्रमणाची कनेक्टिव्हिटी साधण्याचा प्रयत्न करा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार धनवर्षावाचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ नोकरीत शुभलक्षणी. शुभ दिनांक : २६, २७
कन्या : सप्ताह श्रद्धावंतांना अर्थातच गुरुभक्तांना छानच रसद पुरवणारा, कलाकारांना निरागस सूर पकडून देणारा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती. ता. २९ व ३० हे दिवस भन्नाट. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचा आत्मसन्मान वाढणाऱ्या घटना. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ व २६ हे दिवस कुरापती काढणारे. शुभ दिनांक : २८, २९
तूळ : सप्ताहातील शनी-मंगळाची स्थिती हाय व्होल्टेज निर्माण करणारी. आजूबाजूचं अवधान ठेवा. आजूबाजूची मानसिक स्पंदनं खराब राहतील. बाकी सप्ताहात शुक्रभ्रमणाचं स्पंदन स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती खेचून घेतीलच. उद्याचा सोमवार छानच. नोकरीत कौतुक. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस हाय व्होल्टेजचेच. शुभ दिनांक : २६, २७
वृश्चिक : सप्ताहात घरातील भावविश्व जपा. उगाच चिडचिड नको. सप्ताहात गुरुभ्रमणाचा अंडरकरंट छानच राहील. ता. २४ ते २६ हे दिवस विशाखा आणि अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना बाहेरच्या जगात अतिशय सुसंगत राहतील. बाकी ता. २५ व २६ हे दिवस ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची ॲसिडिटी वाढवतील. शुभ दिनांक : २४, २८
धनू : सप्ताहातील परिस्थितीचा फायदा घेणारी रास राहील. नोकरीतील घडामोडी पथ्यावर पडतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती मोठी मजेदार फळं अनुभवतील. ता. २५ ते २७ हे दिवस आपल्या राशीस एकूणच सुसंगत. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींकडून नवस फेडला जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना चोरी-नुकसानीची शक्यता. शुभ दिनांक : २४, २८
मकर : राशीतील वक्री शनीची राजवट घट्ट होणार आहे. राजकारणात पडू नका. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी कायदेशीर बाबी जपाव्या. घरी वा दारी संशयास्पद वागणं टाळा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ ते २६ हे दिवस नोकरीत गुरुकृपा करणारे. वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची वसुली. शुभ दिनांक : २४, २८
कुंभ : सप्ताह तरुणांना धार्जिणाच राहील. काहींना ओळखी-मध्यस्थींतून लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची शैक्षणिक चिंता जाईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ ते २८ हे दिवस शुभग्रहांच्या ताब्यातील; गाठीभेटी, मुलाखतींतून यश देणारे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ चा शुक्रवार कलहजन्य. शेजारी जपा. शुभ दिनांक : २६, २७
मीन : शुभग्रहांची लॉबी क्रियाशील राहीलच. ता. २६ ते २८ हे दिवस उत्तम संगतीचे. महत्त्वाची कामं पार पडतील. काहींना सरकारी माध्यमांतून यश. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा विलक्षण भाग्योदय. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बदलीची लक्षणं. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार समारंभात बेरंगाचा. शुभ दिनांक : २४, २८
















