TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीचा दाखला काढण्यासाठी निघाले…शाळेसमोर झाला भीषण अपघात, मायलेकीसह दुचाकीस्वार नातेवाईकाचाही मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघेही दुचाकीवरून खाली पडल्यानंतर तिघांना रिक्षाने चिरडल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी दहा वाजता घडली होती. भीषण अपघातात तीन जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यातील दुचाकीस्वाराची ओळख पटली मात्र सोबत असलेल्या इतर महिलेसह तरुणीची ओळख पटलेली नव्हती. त्या दोघांचीही बुधवारी सकाळी ओळख पटली असून दोघेही मायलेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गायत्री प्रविण कुळकर्णी (वय-३४) आणि नंदिनी प्रविण कुळकर्णी (वय-११) दोन्ही रा. शिवाजी नगर, जळगाव ह.मु.बडवाणी मध्यप्रदेश असे मयत झालेल्या दोन्ही मायलेकीचे तर महेश गोकूळ जोशी (रा. पिंप्री ता. धरणगाव) मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

असा झाला अपघात !

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवारी सकाळी दहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकूळ जोशी हे त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ९९०३) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि एक तरूणी बसलेली होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले. तेवढ्यात जळगाव शहराकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८०७०) ने रोडवरील तिघांना चिरडले व रिक्षा देखील पलटी झाली. रिक्षातील प्रवाशी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनिता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षा चालका रविंद्र भावलाल पाटील सर्व रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हे जखमी झाले. या भीषण अपघातात जखमी झालेले दुचाकीस्वार आणि दोन अनोळखी महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न..अशी पटली ओळख !

यात अपघातात दुचाकीवरील तीन जणांपैकी दुचाकीस्वार महेश जोशी यांची ओळख पटली होती. तर सोबत असलेल्या ४० वर्षीय महिला आणि तरुणीची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय नयन पाटील, कर्मचारी नरेंद्र पाटील, अनिल फेगडे, अनिल मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता. महेश जोशी याच्या मोबाईल लोकेशनवरून थेट चोपड्यापर्यंत आणि मध्य प्रदेशातील काही गावांपर्यंत देखील महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आले होते. दरम्यान मंगळवारी रात्री मयत महिलेच्या बहिणी आणि पती देखील शोधण्यात तालुका पोलिसांना यश आले. त्यांना दोघांचे मृतदेह दाखवून ओळख पटवण्यात आली. सदरहू महिला ही गायत्री उर्फ सिमा प्रवीण कुलकर्णी (वय ३२ वर्षे) आणि तरुणी ही नंदिनी प्रवीण कुलकर्णी (वय ११, दोन्ही रा. छ. शिवाजी नगर, जळगाव, ह.मु. बडवाणी, मध्य प्रदेश) या असल्याचे निष्पन्न झाले.

ज्या शाळेत जात होते, त्याच शाळेसमोर काळाची झडप !

महेश जोशी व गायत्री कुलकर्णी हे एकमेकांचे नातेवाईक आहे. गायत्री यांची मुलगी नदिनी हीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गायत्री ह्या मुलीसह नातेवाईक महेश जोशी यांच्या दुचाकीने कानळडा रोडवर असलेल्या समर्थ शाळेत जात होते. याच ठिकाणी महेश जोशी यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने ते घ्यावी रस्त्यावर पडले व त्यानंतर तिघांना रिक्षाने चीरडले व यात तिघांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

एकाचवेळी मायलेकीवर अंत्यसंस्कार !

मयत गायत्री यांच्या पश्चात पती, मुलगा मंदार, तर माहेरी चोपडा येथे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. मयत गायत्री या त्यांची बहीण यांच्याकडे काही महिन्यांपासून मध्य प्रदेशातील बडवाणी येथे राहत होत्या. तर महिलेचा पती प्रवीण कुलकर्णी हे जळगावात रिक्षा चालक आहेत. बुधवारी सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील करीत आहे. एकाचवेळी मायलेकिवर अंत्यसंस्काराच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

धरणगाव पी.आर. हायस्कूलच्या बालगोपालांची पर्यावरण दिंडी ; ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा ; पुण्यात भाजपने लावलेल्या बॅनरमुळे वाद, राष्ट्रवादीचा आक्षेप

June 12, 2022

रिलीजपूर्वीच अमित शाह पाहणार ‘पृथ्वीराज’ सिनेमा ; दिल्लीत होणार स्पेशल स्क्रीनिंग

May 25, 2022

राज ठाकरे यांनी केली कोरोनावर मात

October 30, 2021

एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूलमध्ये प्रवेशाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करावे

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group