जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव व चोपडा या ठिकाणी डिजिटल मेमोग्राफी मशीन हे एका कोपर्यात धूळ खात पडून आहे. दरम्यान, यंत्रणा हाताळायला कोणताही तज्ज्ञ नसताना १ कोटी सहा लाखांचे डिजिटल मेमोग्राफी मशीन्स खरेदी करण्यात आल्याचा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी समोर आणलाय. त्यामुळे गरज नसताना इतके महागडे मशीन घेण्याचा नेमका उद्देश काय ?, असा प्रश्नही भोळे यांनी उपस्थित केलाय.
कोणतीही मागणी नसताना, कोणताही निकष नसताना किंवा ती यंत्रणा हाताळायला कोणताही तज्ज्ञ नसताना धरणगाव व चोपडा या ठिकाणी १ कोटी सहा लाखांचे डिजिटल मेमोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्याचा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी समोर आणला आहे. त्यातच या मशीनला हाताळायला कोणी नसून ती धूळखात पडली आहे, ती येथून हलवावी, असे पत्रच धरणगावच्या रुग्णालयातून जिल्हा शल्यचिकित्सकांना गेल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे गरज नसताना इतके महागडे मशीन घेण्याचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न भोळे यांनी उपस्थित केला असून याच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. डिजिटल मेमोग्राफी मशीन हे महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान तातडीने व अचूक करते मात्र, हे मशीन एक तर उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी असणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात त्याचा उपयोग नाही.
मेमोग्राफी मशीन गरज असलेल्या ठिकाणी हलवा
धरणगाव येथील डिजिटल मेमोग्राफी मशीन हे एका कोपर्यात धूळ खात पडून आहे मशीन आल्यापासून त्याला इन्स्टॉल करायला चार महिन्यांचा अवधी लागला इन्स्टॉल झाल्यानंतरही एकाही रुग्णांची तपासणी या मशीनवर झालेली नाही या ठिकाणी तज्ञ नसल्याने कोण हे मशीन वापरणार, असा प्रश्न डॉक्टरांना आहे. अशा स्थितीत हे मशीन वापरायला तज्ञ नाही, ते पडून पडून खराब होईल, त्यामुळे त्याला गरज असलेल्या ठिकाणी हलवा, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना देण्यात आल्याची माहिती आहे.
… तर जबाबदारी कार्यालय प्रमुखाची
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिलेल्या बाबींची खरेदी करतांना पुरवठा आदेश देण्यापूर्वी खरोखर किती साहित्याची आवश्यकता आहे. याचा आढावा कार्यालय प्रमुखांनी द्यावा, खरेदी केलेल्या बाबी विनाकारण पळून राहणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.
दरम्यान, याबाबत प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी दिनेश भोळे यांनी केली आहे. त्यातच धरणगाव येथे मेमोग्राफी मशीन ४४ लाख तर चोपडा येथे ६२ लाखांना घेण्यात आले आहेत.
















