जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील सट्टा बाजाराने जळगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारावर ३५ पैसे तर मविआच्या उमेदवारावर ५५ पैशांचा भाव तर रावेर मतदार संघात महायुतीच्या उमेदवारावर ३० पैसे तर मविआच्या उमेदवारावर ४५ पैशांचा भाव ठरला आहे. याचच अर्थ जळगाव जिल्ह्यातील दोघं जागा भाजप जिंकणार असल्याचे दिसत आहे.
जळगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारावर ३५ पैसे तर मविआच्या उमेदवारावर ५५ पैशांचा भाव तरला आहे. म्हणजेच महायुतीच्या उमेदवारावर एक लाख रुपये लावले आणि जर ते विजगी झाले तर एक लाख ३५ हजार रुपये मिळतील, तर मविजाच्या उमेदवारावर एक लाख रुपये लावले आणि ते जिंकले तर १ लाख ५५ हजार रुपये सटोडींना मिळतील. अशाच पद्धतीने रावेर मतदार संघात महायुतीच्या उमेदवारावर ३० पैसे तर मविआच्या उमेदवारावर ४५ पैशांचा भाव ठरला आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार जळगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जवळपास २ लाख मतांच्या फरकाने तर रावेर मतदारसंघात दीड लाख मतांच्या फरकाने विजयी हाईल, असा अंदाज वर्तविला आहे. एकीकडे देशपातळीवर भाजपच्या जागा कमी होत असल्याची शक्यता सट्टा बाजाराने व्यक्त केली आहे. दुसरीकडे मात्र, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांना कौल दिला आहे. याबाबतचे वृत्त आज ‘दिव्य मराठी’ दिले आहे.