धरणगाव (प्रतिनिधी) वर्ल्ड व्हिजन इंडियाच्या कार्याचा मी साक्षीदार आहे. 100% कार्यक्रमांना मी हजेरी लावलेली आहे. जिथे शासन पोहोचू शकत नाही, एखादा गरजू नियमांच्या चौकटीत बसू शकत नाही. त्या गरजूला मदत व्हावी म्हणून आम्ही वर्ल्ड व्हिजन इंडियाचे सहकार्य घेतो. असे प्रतिपादन जिप सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी केले.
वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी केंद्रातील मुले व मातांचे वजन मोजण्यासाठी अद्यावत डिजिटल वजनकाटे वितरण, कुपोषित बालके, रक्तक्षयी किशोरवयीन मुलींसाठी धान्य वितरण, मच्छरदाणी वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, देवेंद्र राऊत, महिला व बाल विकास विभाग उपमुख्य कार्य अधिकारी नेहा पवार, गटविकास अधिकारी टीएमओ डॉ सोनवणे, संजय धनगर CDPO, वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रोजेक्ट मॅनेजर अनिल बल्लूरकर, ICDS स्टाफ, TMO स्टाफ, वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव स्टाफ, अंगणवाडी सेविका व मान्यवर उपस्थित होते.