चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावच्या ६३ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या एकूण १७ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
बुधवारी दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक जण चाळीसगाव आणि दुसरा चोपडा येथील आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने अखेरचा बळी घेतला होता. त्यानंतर तिसरी लाट देखील लगेच उतरणीला लागली होती. दरम्यान, जिल्ह्यात सध्या १७ जण उपचार घेत आहेत त्यात सर्वाधिक आठ जण चोपडा तालुक्यातील आहेत भुसावळला तीन आणि जळगाव शहरात एक जण उपचार घेत आहे. तसेच कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या २,५९२ झाली आहे.