यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळमध्ये (Yavatmal) एका रुग्णालयात डॉक्टरावर (doctor) गोळीबाराची (gun fire) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या (Uttarwar Hospital in Yavatmal) परिसरात घडली आहे. हल्ला झालेल्या डॉक्टराचं नाव हनुमंत धर्मकारे आहे.
या गोळीबारामुळे डॉक्टर धर्मकारे हे जखमी झाले आहे, त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत डॉक्टरांनी केलेले काम आपण कधीच विसरू शकत नाहीत. दरम्यान, राज्यात पुन्हा एका कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. मात्र, दुसरीकडे यवतमाळमध्ये एका रुग्णालयात डॉक्टरावर गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या परिसरात आले असता अचानक दोन तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मकारे यांच्यावर बेछुट गोळीबार केला. हनुमंत धर्मकारे हे दुपारी रुग्णालयातून घरी निघाले होते. मात्र, रुग्णालयाच्या समोरच डॉक्टर धर्मकारे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. धर्मकारे यांच्यावर गोळीबार होताच मोठा गोंधळ उडाला होता. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. डॉक्टर धर्मकारे यांच्यावर का आणि कशासाठी गोळीबार केला, याचा तपास पोलीस करत आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीस हल्लेखोराना लवकर ताब्यात घेतील असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.