TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी योगा अतिशय महत्वपूर्ण !

सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी राऊतांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड काळात योगाचे महत्व आपण सर्वांनीच जाणले आहेत. यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ ही असल्याने सामाजिक स्वास्थासाठी योगा हा महत्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, शालेय शिक्षण विभाग, जळगाव, हौशी योगा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ऑनलाईन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना राऊत बोलत होते. या कार्यक्रमात महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, डॉ अनिता पाटील, क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, योगप्रेमी ऑनलाईन सहभागी झाले होते.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, योगा हा एक दिवसापुरता मर्यादित न रहाता तो दररोज करायला पहिजे, प्रत्येक नागरीकाने आपल्याला रोज जसा वेळ मिळेल तसा योगा केला पाहिजे. कोविडमुळे शाळा बंद आहे. शाळा नियमीत सुरु झाल्यावर शाळांमध्ये नियमितपणे योगाचे अभ्यास वर्ग कसे घेता येईल याबाबत विचार करण्यात येईल. शाळेतील प्रत्येक विद्यार्थाला योगदूत बनवुन एका विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबामध्ये योगाचा प्रचार केला तरी संपूर्ण समाजामध्ये जागृती होवू शकते. समाजाच्या स्वास्थासाठी मुलांनी योगदूत बनून योगाचा प्रचार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महानगरपालिका आयुक्त सतिश कुलकर्णी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, २१ जुन हा सौर वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. अशा या २१ जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता देण्यात आली. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी व स्वास्थासाठी योगा करणे महत्वाचे आहे, धर्म, अर्थ, काम यासाठी स्वास्थ अत्यंत आवश्यक असल्याने योगा करणे गरजेचे आहे. योगामुळे आपण शरीराचा मानसिक ताण घालवू शकतो. त्यामुळे आगामी काळात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वानी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा हौशी योगा असोसिएशनच्या सचिव डॉ. अनिता पाटील यांनी केंद्रीय विद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू नंदिनी दुसाने सोबत आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार योगाचे प्रात्याक्षिक, योगसाधना, प्राणायम, शरीर शिथलीकरणाची आसने, उभी व बसलेली आसने सहभागी विद्यार्थी, नागरीक यांना ऑनलाईन दाखवून करुन घेतली तसेच आसनांचे महत्वही सांगितले.

जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने यांनी मानले.

तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत व शालेयस्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ऑनलाईन कॉमन योगा प्रोटोकॉल कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी तसेच बहुसंख्य नागरीक, विद्यार्थी, क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तर अनेकांनी घरी कुटुंबांसोबत योगसाधना केल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद ‍दिक्षित यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

"पण महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल" : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठ्या आनंदात हरिद्वार यात्रेसाठी आई-वडीलांना सोडायला गेले अन् शिक्षका सोबत घडलं अघटीत !

May 26, 2023

भरधाव कार दुभाजकावर आदळली ; साक्रीचा तरुण जागीच ठार !

January 18, 2024

भयंकर ! पती आणि मुलांसमोर रेल्वे स्थानकावर महिलेवर तीन नराधमांनी केला बलात्कार !

May 2, 2022

कनाशी येथील बालकाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू !

November 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group