TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2023
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनच्या जैन अॅग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन हायटेक प्लान्ट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा यासह अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, गांधी रिसर्च फाऊंडेशन यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आरोग्याविषयी सजग होत प्रशिक्षकांकडून योगाभ्यास समजून घेतला. स्वस्थ हृदयासाठी योग्य योग आणि आहार या संकल्पनेवर योग दिन साजरा केला.

सांस्कृतिक, धार्मिक उत्सवांप्रमाणेच योगउत्सव असून योग, प्राणायाम, ध्यान हे दैनंदिन जीवनात अंगिकार करण्याचा संकल्प जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या सहकाऱ्यांनी केला.सात्विक आहारासह योगाचे महत्त्व जैन फूडपार्क, एनर्जी पार्क व अॅग्री पार्क च्या ९०० च्यावर सहकाऱ्यांनी योग आणि आहारातून आरोग्यमय जगण्याचा मंत्र समजून घेतला. योग प्रशिक्षीका कमलेश शर्मा यांनी स्वात्विक, राजसीक, तामसीक आहाराबाबत सांगितले. सकस आहार असेल तरच मन शांत राहते. मन शांत ठेऊन शारिरीक व्याधींना दूर ठेवता येते, यासाठी रोज एक तास सूर्यनमस्कार करावे. यामूळे बाह्य शरीर, अवयव आणि मन यावर काम करता येते. चांगली झोप, भोजन, व्यायाम व प्राणायाम यातून उत्तम आरोग्य राखता येते. असे मार्गदर्शन करत सहकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकांसह योगाची विविध आसने  कमलेश शर्मा यांनी करून घेतले. त्यांचे स्वागत डॉ. जयश्री राणे यांनी केले. वरिष्ठ सहकारी रोशन शहा यांनी आभार मानले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल ढाके, सुनील गुप्ता, प्रदीप सांखला, व्ही. पी. पाटील, आर. बी. येवले यांच्यासह वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, भिकेश जोशी, आर. डी. पाटील यांच्यासह मानव संसाधन विभागाच्या सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

READ ALSO

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

जैन प्लास्टिक पार्क येथे योगा दिवस साजरा
मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना संयमित करण्यासाठी योगाभ्यास ही उत्तम साधना आहे. २१ जून जागतिक योग दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथील प्रशासकीय इमारतीसमोरच्या पटांगणावर योगगुरु सुर्यागीरीजी उर्फ सुभाषजी जाखेटे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करून घेतला. यावेळी कंपनीच्या सहकारी सौ. संगीता खंबायत यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्लास्टिक पार्क येथील सुमारे हजारहून अधिक स्त्री व पुरुष सहकारी उपस्थित होते. आरंभी कंपनीचे सहकारी किशोर बोरसे यांनी प्रास्ताविक केले. त्यात ते म्हणाले की, ज्या प्रमाणे मोठ्याभाऊंनी कार्याचा वारसा दिला त्याच प्रमाणे उत्तम आरोग्याचा मंत्र ही दिला. सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे या दृष्टीने कंपनीत विविध उपक्रम राबविले जातात याबाबत त्यांनी सांगितले. सहकाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती, शरीरास हानिकारक असे चहा-कॉफी आणि मादक द्रव्य सेवनास बंदी तसेच कँटिनमधील जेवणात अत्यल्प प्रमाणातील तेल, मीठ, मिरची इ. अशा अनेक बाबींमधून श्रद्धेय मोठ्याभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांच्या निरोगी आणि सुरक्षित आयुष्यासाठी नेहमीच काळजी घेतली. आजही मोठ्याभाऊंच्या प्रेरणादायी विचारांमध्ये अनेकदा सहकाऱ्यांच्या आरोग्य विषयक जागरूकता दिसून येते असेही त्यांनी सांगितले. सकाळी ८ वाजता सर्व सहकाऱ्यांनी ओंकाराने योगाभ्यासास सुरूवात केली. अर्ध तितली आसन, ताडासन, तिलक ताडासन, अनुलोम मिलोम, भ्रमरी प्राणायम करताना श्वास-उच्छवासाचे नेमके तंत्र त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखविले. या दिवसाच्या निमित्ताने काही सहकाऱ्यांनी वर्षभर योग करण्याचा संकल्प ही घेतला. अनिल जैन, राजेश आगिवाल, राजेश शर्मा, युवराज धनगर, हेमराज वाणी, महेंद्र पवार, योगेश नारखेडे, निलेश भावसार तर डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ.अनिल पाटील  यांनी परिश्रम घेतले.

जैन टिश्यूकल्चर पार्क
महिलांच्या निरामय आरोग्य या विषयावर कमलेश शर्मा यांनी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा येथे मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिनी जीवनात योग करण्याच्या पद्धती समजून सांगितले. विजयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक व स्वाग केले. यावेळी त्यांच्यासोबत विजयसिंग पाटील, सुरक्षा विभाग इंद्रजित कुमार, डॉ. अश्विनी पाटील, राजाराम देसाई, मानव संसाधन विभागाचे सी. पी. चौधरी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मानव संसाधन विभागाचे सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

अनुभूती निवासी स्कूल
डिव्हाईन पार्कच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योग दिनाचे महत्त्व समजून घेत योग साधना केली. प्रत्येक वर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवाय अनुभूती स्कूल निवासी असल्याने रोज सकाळी योगाचे विशेष सत्र घेण्यात येते. भारतीय संस्कृतीत ओमकार आणि प्रार्थनेचे महत्त्व अनुभूती स्कूलच्या निवासी डॉक्टर तथा योगशिक्षिका डॉ. स्नेहल पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकडून त्यांनी ताडासन, कटिचक्रासन, त्रिकोणासन, गोमूखासन, मेरूदंड, वक्रासान, शशांकासन, भ्रमरी प्राणायम यासह विविध योगाभ्यास करून घेतला. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य देबासिस दास यांच्या उपस्थितीत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. दरम्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलमध्ये सुद्धा योग दिवस साजरा झाला.
गांधी रिसर्च फाऊंडेशन
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या प्रांगणात सर्व सहकाऱ्यांनी विविध योगासने करून योग दिन साजरा केला. डॉ. गिता धरमपाल यांच्याहस्ते महात्मा गांधीजींची प्रतिमा व सूतीहार देऊन कमलेश शर्मा यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व आभार डॉ. अश्विन झाला यांनी केले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

April 13, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
Next Post

पाच हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिस हवालदारास पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ विवाहितेचा मृत्यूचा झाला उलगडा ; गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा !

February 5, 2022

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांकडून मोह प्रकल्पाची पाहणी

February 23, 2021

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025

धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात याचिकाकर्ते अशोक पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group