धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने एरंडोल काँग्रेस पक्षाचे नगरसेवक योगेश महाजन यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
योगेश महाजन यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळेस तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चंदन पाटील, सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष संभाजी कंखरे, युवक काँग्रेस अध्यक्ष गौरव चव्हाण, उपाध्यक्ष योगेश येवले, प्रमोद जगताप उपस्थित होते.