जळगाव (प्रतिनिधी) भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या निखिल संतोष सपकाळे (वय ३१, रा. साकेगाव, ता. भुसावळ) या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना गोदावरी हॉस्पिटल येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील निखिल सपकाळे हे चालक म्हणून नोकरी करतात. दि. २६ रोजी सायंकाळी गोदावरी हॉस्पिटल येथे भांडण सुरु होते. ते भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्याचा राग आल्याने रोहीत संजय धनगर व भावेश संजय धनगर या दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रत्तने वार केले. यामध्ये निखील सपकाळे याच्या हातावर आणि पंज्यावर गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी त्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहे.