जळगाव ( प्रतिनिधी ) : कौटुंबिक वादातून नातेवाईकांनी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सत्यराज गायकवाड (रा. गणेश नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तरुण रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्याने हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक करा अशी मागणी लावून धरली. परंतू त्याची प्रकृती गंभीर होत असल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
शहरातील गणेश नगर भागात राहणाऱ्या सत्यजीत गायकवाड या तरुणावर कौटुंबिक वादातून त्याच्या नातेवाईकांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने हल्ला केला. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत तरुण जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यावेळी तो पोलीस ठाण्याच्या आवारात बसनू धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तो बराच वेळ पोलीस ठाण्याच्या प्रांगणात थांबून होता. हल्ल्यानंतर सत्यराज गायकवाड यांच्या हातातून रक्तस्त्राव होत होता. हा हल्ला कौटुंबिक वादातून नातेवाईकांनीच केल्याची माहिती त्यांच्या बहिणीने दिली आहे.
जबरदस्तीने केले रुग्णालयात दाखल
तरुणावर हल्ला करणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीवर सत्यजीत हा अडून बसला होता. रक्तस्त्रावामुळे त्याची प्रकृती गंभीर होत असल्याने शेवटी नातेवाईकांनी जबरदस्ती करून त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले.
















