TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीस केली अटक

vijay waghmare by vijay waghmare
July 24, 2026
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने डोक्यावर काठीने वार करून काकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर अपघात झाल्याचा बनाव करीत मयत काकाचा मृतदेह नाल्याजवळ कडेला टाकल्याची घटना रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून उघडकीस आणली आहे. या प्रकरणी आरोपीस अवघ्या काही तासांत पुतण्या अनिल जखा बारेला रा गारखेडा याला अटक करण्यात आली आहे.

दि. २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.०० वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती रावेर पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तपास चक्रे फिरवली. घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळवली. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले

READ ALSO

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

की, मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९) रा. गारखेडा याचे मयतासोबत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते. याच वादाच्या रागातून दि. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या गंभीर मारहाणीत रामा थावरू बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. अटकेची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच रावेर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

पुतण्याचा बनाव पोलीसांनी केला उघड

गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटे जवळील नाल्याच्या कडेला टाकून दिला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याच असल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने, वैज्ञानिक पद्धतीने व कौशल्यपूर्ण तपास करून हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी आरोपी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत पोलीस पाटील दिनेश नामदेव पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल बारेला आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: raverYouth murdered in Garkheda over land dispute

Related Posts

गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील नियोजित उद्यानाला राष्ट्रसंत गाडगेबाबांचे नाव देण्यात यावे ; समाज बांधवांची मागणी !

January 17, 2023

कसोदा येथे ४ सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त !

November 7, 2024

पाचोरा : ट्रकखाली आल्याने तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू !

May 16, 2024

खळबळजनक : पतिने विषप्राशन केल्याने बिडगाव येथे दोन मुलींसह आईची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

March 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group