कजगाव ( प्रतिनिधी) – भडगाव मार्गावरील कजगाव शिवारात झालेल्या कार व दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. तर दुचाकी पुण् जळून खाक झाली. दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठ ठप्प झाली होती.
मालेगाव येथील चार जण कार (एमएच ०१ सीएच – ४२६०) ने लग्न समारंभासाठी कासोदा येथे जात होते. तर पाचोऱ्याकडून मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे दुचाकी व कारची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. या आगीत दुचाकीचा कोळसा झाला. तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर चारचाकीतील एयरबॅग उघडल्याने कारमधील प्रवाशी सुखरूप् बाहेर पडले. दरम्यान, दुचाकी व कारमध्ये झालेल्य अपघातात दुचाकीने पेट घेतल्याने आगीचा मोठ धुराळा उडाला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप् झाली होती. या घटनेबाबत कजगाव पोलीस मदत केंद्रात माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, कजगावचे पोलीस पाटील राहुल पाटील भोरटेकचे भाऊसाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर दुचाकी स्वार तरुणास तत्काळ रुग्णवाहिक मागवून उपचारासाठी चाळीसगाव येथे रवाना केले यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.














