TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे महत्त्वाचे- पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव व धरणगाव तालुक्यातील भजनी मंडळांना तीन टप्यात 177 साहित्याचे वाटप !

vijay waghmare by vijay waghmare
July 25, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार असून संत कार्यासाठी सदैव झटत राहणार असून ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील 79 भजनी मंडळांना आज साहित्याचे वाटप करण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाने सनातन संस्कृती टिकवली असून गावा – गावात संप्रदाय वाढवाला आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणिव भासत असल्याने सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जिल्हास्तरीय वारकरी भवन उभारण्याचा मानस पूर्ण होत असल्याने त्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगितले. वारकरी संप्रदाय वाढीसाठी व जनसामान्याच्या कार्यासाठी नेहमीच कटिब्ध्द राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

आतापर्यंत तीन टप्यात 177 भजनी साहित्य वाटप !

ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजरासाठी भजनी मंडळ साहित्याची खूप गरज असते हिच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 57, दुसऱ्या टप्प्यात 41 आणि आज तिसऱ्या टप्प्यात 79 असे एकूण 177 गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले.

गुलाबभाऊ म्हणजे राजकारणात परमार्थ रुजविणारे नेतृत्व – ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर

याप्रसंगी ह.भ.प. गजानन महाराज यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असतो. गुलाबभाऊंच्या माध्यमातून खान्देशाला उज्जवल नेतृत्व लाभले आहे. या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृगाचा आवाजाचे पुण्य गुलाबभाऊंना लाभत असून पालकमंत्री गुलाब भाऊ म्हणजे राजकारणात परमार्थ रुजविणारे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज यांनी सांगितले.

प्रस्ताविकात माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असून त्यांना सहकार्य म्हणून तीन टप्यात आतापर्यंत 177 भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन ह.भ.प. प्रा.सी एस पाटील यांनी केले. आभार सुशील महाराज विटनेरकर यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी , ह.भ.प. चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवरकर ह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, कैलास महाराज चोपडाईकर, ह. भ.प. बाबा हंस महाराज, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे , शाळेचे चेरमन विक्रम पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, अर्जुन पाटील, शिवराज पाटील , राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल, मा. सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, रविंद्र चव्हाण सर, सचिन पवार, कैलास पाटील भरत बोरसे, गजानन पाटील, दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, जितू पाटील, राजू पाटील, स्वप्नील परदेशी, भानुदास विसावे, परिसरातील सरपंच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच , वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

जिल्ह्यात विविध विभागात 414 जणांना नव नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना नियुक्तीपत्र प्रदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव शहराला अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर मीटर देण्यासाठी प्रस्ताव !

January 29, 2021

शेतकऱ्याच्या आमरण उपोषणस्थळी दीपक वाघमारेंची भेट ; गुलाबराव देवकरांसोबत साधला संवाद !

September 22, 2022

पिस्टलचे लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक ; जळगाव एमआयडीसी पोलीसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

August 28, 2024

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आ. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group