TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवारंग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2023
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ”युवारंगसारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून यातून भावी काळात करिअर साठी नक्कीच लाभ होणार आहे” .असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते.

यावेळी अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आ. सुरेश्‍ भोळे, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, महोत्सवाचे कार्याध्‌यक्ष राजेंद्र नन्नवरे, सहसंचालक प्रा.संतोष चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी पाटील, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, ॲङ अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य एस.एन. भारंबे, राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल राव, भरत अमळकर, प्र. अधिष्ठाता प्राचार्य एस.एस.राजपूत, प्राचार्य ए.पी. खैरनार, प्राचार्य अशोक राणे, ॲङ प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, ॲङ प्रवीणचंद्र जंगले, रुपेश चिरमाडे, संजय प्रभूदेसाई, सीए रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील, डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ.मनोज महाजन यांची उपस्थिती होती.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, महाविद्यालयात शिकत असतांना मी अभ्यासात पक्का नव्हतो पण कलेमध्ये पुढे होते. त्या कलेचा फायदा मला राजकारणात झाला. आणि राजकारणात चांगली संधी मिळत गेली. तुमच्या शिक्षणासोबतच तुमची मांडणी कशी आहे. हे महत्वाचे असून त्यामुळे कला सादर करतांना उत्तम करा. यातूनच उद्यााचे कलावंत घडणार आहेत. जे राज्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवतील . या महोत्सवात मुलींचा सहभाग वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठ हे सातत्याने विविध उपक्रमांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून कोविड नंतर यंदा प्रथमच पहिल्या सत्रात युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन यातील विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्य स्पर्धेत सहभाग घेता येईल. या महोत्सवात शिस्त पाळा. शिस्तीचे महत्व लक्षात आल्यास जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिस्त महत्वाची आहे हे तुम्हाला लक्षात येईल. सर्वांचे कला प्रकार बघा असे आवाहन केले. भविष्यातील नामवंत कलावंत या माध्यमातून करीअर निवडलेला विद्यार्थी होऊ शकतो. आता तर नव्या शैक्षणिक धोरणात मुख्य विषयाबरोबर आवडीचा विषय निवडण्याची मूभा देण्यात आली आहे. त्यांनी माहिती व ज्ञान, जोडणी व नाते व आनंद याबद्दल तरूण पिढीमध्ये काही गोंधळ आहे असे सांगून यातील फरक विषद केला. विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि क्षमता हे गुरु मानावेत, अभिमान व अहंकार यातील फरक शोधावा.

विकासचंद्र रस्तोगी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी हट्ट धरावा असे आवाहन करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना सर्वव्यापी व परिपूर्ण शिक्षण मिळेल असे मत व्यक्त केले. असे महोत्सव म्हणजे वर्ग खोलीच्या बाहेर शिकण्याची व व्यक्तीमत्व घ्डविण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. अशोक जैन यांनी करिअर घडविण्यासाठी कला हा देखील मार्ग आहे. या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून वाटचाल करा अडचण आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही अशोक जैन यांनी दिली.

स्वागतपर मनोगतात युवारंग कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले की, स्वातत्र्यपूर्व काळात तत्कालीन शिक्षणाची गरज ओळखून केसीई संस्थेची स्थापना करण्यात आली असून शैक्षणिक क्षेत्रात ही संस्था ऋषीतूल्य म्हणून काम करीत आहे. नव्यापिढीने भगवद् गीतेतील तत्व उराशी बाळगावे असे आवाहन केले.

या महोत्सवाचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्न्वरे यांनी देशाने विकासात आघाडी घेतली असून चांद्रयान मोहिम यशस्वी झाली, आशियाई स्पर्धेत १०० पेक्षा अधिक पदके भारताने मिळवली. विकसित भारतासाठी पंचप्रण देण्यात आले आहेत. हा वारसा विद्यार्थ्यांनी जोपासावा असे आवाहन केले.

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक व महोत्सवाचे संयोजक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी विद्यापीठाची भूमिका विशद करतांना सांगितले की, ४५० विद्यार्थी आणि ८२५ विद्यार्थिनी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ कटीबध्द आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोककला महोत्सव, विद्यार्थी साहित्य संमेलन व दिव्यांग कला महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर प्रा. कपील शिंगाने आणि विद्यार्थी यांनी राज्यगीत सादर केले. डॉ.अखिलेश शर्मा यांनी इशस्तवन केले. विद्यार्थिनी दिप्ती पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन वातावरणात स्फुरण चढविले. सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री भलवतकर व डॉ.योगेश महाले यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

मोठी बातमी : आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता ; आयोगाची दुपारी पत्रकार परिषद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : धनादेश अनादरप्रकरणी डॉ. शीतल ओसवाल यांना एक वर्षाची शिक्षा !

August 18, 2023

भुसावळात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या !

October 26, 2020

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2025 !

November 13, 2025

सुब्रोतो फुटबॉल चषक : १४ वर्षा आतील मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन उप विजयी !

August 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group