TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुसऱ्यांदा महाभियोग दाखल झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले…

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2021
in राष्ट्रीय
0
President Donald Trump walks to board Marine One on the South Lawn of the White House, Tuesday, Jan. 12, 2021 in Washington. The President is traveling to Texas. (AP Photo/Gerald Herbert)

President Donald Trump walks to board Marine One on the South Lawn of the White House, Tuesday, Jan. 12, 2021 in Washington. The President is traveling to Texas. (AP Photo/Gerald Herbert)

Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कॅपिटॉल हिलमध्ये ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या हिंसाचारप्रकरणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोहाची कारवाई करण्यात येणार आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत कॅपिटॉल येथील हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच शांतता राखण्याचे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. एकीकडे कारवाई सुरु असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती टाळा असंही म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, हिंसाचार मी विश्वास ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीविरोधात तसेच आपल्या चळवळीविरोधात आहे. माझा खरा समर्थक असा राजकीय हिंसाचार करणार नाही. माझा कोणताही समर्थक अशा पद्धतीने कायद्याचा आणि आपल्या ध्वजाचा अपमान करणार नाही. आपल्या नागरिकांना अशा पद्धतीने धमकावणार नाही. यापैकी तुम्ही काहीही केले असेल तर तुम्ही चळवळीला पाठिंबा देत नाही. तर तुम्ही त्यावर हल्ला करत आहात. तुम्ही आपल्या देशावर हल्ला करत आहात आणि हे सहन केले जाणार नाही. कोणतीही माफी, अपवाद नाही. अमेरिकेत कायद्याचे राज्य असून हिंसाचारात सहभागी झालेल्यांना योग्य शिक्षा केली जाईल, असे आश्वासनही यावेळी ट्रम्प यांनी दिले आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी टाकलेल्या बंदीचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. आपल्या काही लोकांना सेन्सॉर किंवा ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रयत्न चुकीचे आणि घातक आहेत. सध्या आपण एकमेकांचे ऐकून घेण्याची गरज आहे, एकमेकांना शांत करण्याची नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठी उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी २५ वी घटनादुरुस्ती लागू करावी, अशी सूचना करणारा ठराव आज प्रतिनिधीगृहामध्ये मंजूर करण्यात आला. २२३-२०५ अशा फरकाने हा ठराव मंजूर करण्यात आला. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य असलेल्या प्रतिनिधीगृहामध्ये हा ठराव्‌ मंजूर होण्यास विशेष अडचण आली नाही. पक्षभेद विसरून रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांनीही या ठरावाच्या बाजूने मतदान केले. पलोसी यांनी सभागृहात ६ जानेवारीला असे सांगितले होते, की ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅपिटॉल हिल या संसदेच्या इमारतीत हिंसाचाराला उत्तेजन दिले होते. त्यामुळे अमेरिकी लोकशाहीला काळिमा फासला गेला आहे. जो बायडेन व कमला हॅरिस यांच्या निवडीवर प्रतिनिधीवृंदाचे शिक्कामोर्तब होत असताना ट्रम्प यांनी हा हिंसाचार घडवून आणला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

सारबेटे येथील वृद्धास आत्महत्येस केले प्रवृत्त ; नातेवाईकांनी मृतदेह आणला पोलीस स्थानकात ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल : बच्चू कडू

December 10, 2020

खळबळजनक : चाळीसगाव तालुक्यात एकाच दिवसात दोन खून !

June 9, 2023

उद्धव ठाकरेंसारखा पार्टटाईम नाही तर फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा : भाजप नेते सी. टी. रवी

November 16, 2021

एटीएसची मोठी कारवाई ; जोगेश्वरीतून संशयित दहशतवादी ताब्यात !

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group