TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि.प. शाळांमुळेच मराठी भाषा टिकून : पालकमंत्री गुलाबराव पाटील

नांद्रा येथे शाळेला संगणक प्रदान आणि मोतीबिंदू शिबिर उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनेक अडचणींवर मात करून जिल्हा परिषदेच्या शाळा आगेकूच करत असून दर्जेदार ज्ञानदानाचे काम करत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमुळेच मराठी भाषा टिकून असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील नांद्रा येथील जि.प. शाळेला संगणक प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, यासोबतच आज नांद्रा येथे मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात १७२ जणांची तपासणी करण्यात आली असून ४४ स्त्री-पुरूषांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

कुमारी क्रिशा हेमंत आगीवाल या बालिकेच्या वाढदिवसानिमित्त नांद्रा जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देण्यात आला. याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी क्रिशाचे व तिच्या आई वडिलांचे मन:पूर्वक कौतुक केले. आमदार निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या परिसरेत पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तर मातोश्री ग्रामसमृध्दी शेत-पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून परिसरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येतील आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नांद्रा येथील ग्रामपंचायतीची नूतन इमारत उभारण्यात येणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले. परिसरातील सर्व महत्वाच्या विकासकामांना गती मिळाली असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

याच कार्यक्रमात राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेटमध्ये यश संपादन केलेल्या किरण सुधाकर गोसावी, डॉ. के. बी. पाटील यांचा तर सी.ए. असोसिएशनमध्ये निवड झाल्यामुळे सी.ए हितेश आगीवाल यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.

दोन्ही चिमुकल्यांचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

कुमारी क्रिशा हेमंत आगीवाल या बालिकेने वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता या पैशांमधून शाळेला संगणक भेट दिल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तिचे आणि तिच्या पालकांचे कौतुक केले. तर जि. प. शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणार्‍या रोशनी भरत वाघ या बालिकेने ना. गुलाबराव पाटील यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून श्री गणेशाची मूर्ती भेट दिली. पालकमंत्र्यांनी या भेटीचा प्रेमपूर्वक स्वीकार करून तिचे तोंड भरून कौतुक केले.

तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संगणक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी , उपसभापती सुरेश पाटील, माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक अनिल भोळे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, जळगाव देखरेख संघ माजी चेअरमन किशोर आगीवाल, ग्रामपंचायत सरपंच पती कैलास पाटील, उपसरपंच पती पंकज सोनवणे, सदस्य निलेश वाघ , सुनील सोनवणे, एकनाथ सोनवणे मनोज सोनवणे, गणेश सोनवणे, विजय बाविस्कर, प्रकाश सोनवणे, समाधान पाटील, मनोज पाटील, चुडामन वाघ, पितांबर सपकाळे, सुरेश सोनवणे, जयराम सोनवणे, भाऊसाहेब पाटील, अशोक आण्णा सोनवणे, शांताराम पाटील, डॉ. कमलाकर पाटील, वि.का.सो. चेअरमन अजबराव पाटील, उद्योजक दिलीप आगीवाल, मुख्याध्यापक संजय भालेराव, उपशिक्षक राजेंद्र चव्हाण, सुधाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा व हितेश आगीवाल, मुकुंद गोसावी, मुख्याध्यापक संजय भालेराव व शालेय शिक्षक सुधाकर पाटील व उपशिक्षक राजेंद्र चव्हाण आदींनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय भालेराव यांनी केले तर आभार उपशिक्षक सुधाकर पाटील यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

जमीअत उलमा हिंद व हुफ्फाज फाउंडेशनतर्फे फारुक शेख सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल येथे ९७ हजाराच्या बनावट नोटा जप्त; तिघे ताब्यात !

November 15, 2024

मोठी बातमी : चोपड्यात दरोड्याचा प्रयत्न ; चार दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक !

June 5, 2022

कायद्याचं उल्लंघन केल्यावर आरती करायची का? ; संजय राऊतांचा भाजपला टोला

August 30, 2021

मेहरूण येथे तीन दिवशीय “दरबार मेरे साई का” साईकथेचे आयोजन

January 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group