जळगाव (प्रतिनिधी) पोखरीतांडा येथील मंदिराच्या भक्तांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे पेव्हरब्लॉक बसवण्याची मागणी केली होती. याची दखल घेत प्रतापराव पाटील यांनी त्वरित स्वखर्चाने दोन दिवसात पेव्हर ब्लॉक बसवून दिले.
पोखरीतांडा येथे रामदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील उपस्थित असताना तेथील भक्तांनी मंदिराच्या परिसरात पेव्हरब्लॉक बसवण्याची मागणी केली. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्वरित स्वखर्चाने दोन दिवसात पेव्हर ब्लॉक बसवून दिले. यामुळे मंदिराचा परिसर सुशोभित होऊन ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.