TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी करा ; विधानसभेत आ. चिमणराव पाटील यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2022
in आरोग्य, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटर खरेदीत कोट्यांवधीचा घोटाळा झाल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी केली होती. याप्रकरणी त्रयस्त चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी केली.

आमदार चिमणराव पाटील यांनी सभागृहात म्हटले की, मला या ठिकाणी खेदाने नमूद करावंसं वाटतं की, जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नावाखाली जि खरेदी झाली, जी कामं झाली ती अत्यंत निकृष्ट प्रतीची झाली. ऑक्सीजन प्लांट करण्याचा संकल्प करण्यात आला होता. परंतु एकही ऑक्सीजन प्लांट कार्यरत नाही. एक लिटर ऑक्सीजनही कुणाला मिळू शकत नाहीय, अशा प्रकारची अवस्था जिल्ह्यात आहे. कोरोना काळात ज्या-ज्या गोष्टी घेण्यात आल्या होत्या. त्यात थर्मामीटर, पीपीई कीट आणि व्हेंटिलेटरसह इतर गोष्टींचा समावेश होता. व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन यांना आम्ही नियोजन मंडळाच्या बैठकीत तक्रारी दिल्या. ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर आपण मागविले होते, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे व्हेंटिलेटर आलेले नाहीत. आणि तरीसुद्धा व्हेंटिलेटर स्वीकारण्यात आले. अगदी तक्रार झाली तेव्हा ते व्हेंटिलेटर त्यांनी परत केले. यात गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे डीपीडीसी आणि आरोग्य विभागामार्फत झालेल्या कामाची त्रयस्त एजन्सी किंवा ऑडीटर यांच्यामाध्यमातून चौकशी करण्यात यावी. कारण आज लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आज जनतेच्या मनात गैरसमज निर्माण झालाय की, यांनी या ठिकाणी काही तरी गैरव्यवहार केलाय. जनतेचा हा गैरसमज जर दूर करायचा असेल तर आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असेही आमदार चिमणराव पाटील म्हणाले.

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

 

शिवसेनेची सभागृहात दुसऱ्यांदा मागणी 

जळगावातील कथित व्हेंटिलेटर खरेदी घोटाळ्याच्या बाबतीत याआधी शिवसेनेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार विलास पोतनीस यांनी मागील अधिवेशनात विधान परिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. (१) जळगाव जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणाखाली ३० व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?. (२) असल्यास सदर खरेदी प्रक्रिये प्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे काय?. (३) असल्यास समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय, सदरहू अहवालात कोणत्या शिफारसी करण्यात आल्या आहेत आणि तद्नुषंगाने दर्जाहीन व्हेंटिलेटर पुरवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित कंपनीवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे. (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?, असे प्रश्न उपस्थीत केले होते. त्यानंतर आज शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी त्रयस्त एजन्सी किंवा ऑडीटर यांच्यामाध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

चौकशी समितीत एकही तज्ज्ञ नसल्याचा आरोप

तक्रारीनंतर नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीत समाविष्ठ लोकांमध्ये एकही तज्ज्ञ नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे केवळ चौकशीचा फार्स असून, चौकशीच चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप तक्रारदार दिनेश भोळे यांनी होता. तसेच चौकशीच्या आधी आरोप असणाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी शिवराम पाटील यांनी केली होती.

 

भोळेनी पोलिसात नोंदावली ऑनलाईन तक्रार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर नसल्याने शेकडो नागरिकांचे बळी गेले होते. यामुळे राज्यात सरकारने व्हेंटिलेटर अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला देण्यात आले होते. पण या अधिकारांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी करत घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच दिनेश भोळेंनी बुधवारी पोलिसांच्या सीसीटीएनएसला ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. तसेच याची एक प्रत पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री

July 23, 2021

पाळधी गावात शीरखुर्मा पार्टीचे आयोजन ; सामाजिक सलोख्याच्या दिला संदेश ! 

April 1, 2025

भाजप प्रवेशाची चर्चा आणि खडसेंनी घेतली बुधवारी रात्री निकटवर्तीयांची गुप्त बैठक !

April 4, 2024

जळगावात हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा, बांगलादेशी तरुणी सापडल्यामुळे उडाली खळबळ !

December 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group