जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून एका ट्रक चालकाकडून दीड हजार रूपयांची रोकड लुटल्याची घटना मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दोघं फरार आहेत.
निहाल अहमद इपतेखार अहमद शेख हे ट्रक (क्र.एम.एच.१८ बी.जी.८७८९) या ट्रक चालकाकडून मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपाजवळ तिघांनी चाकू दाखवून लुटमार केली. याप्रकरणी भिमराव मुकेश पवार (इंद्रप्रस्थ नगर), दुर्गेश आत्माराम सन्यास व आणखी एक अशा तिघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भिमराव पवार याला अटक करण्यात आली असून इतर दोघं जण फरार आहेत. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. गणेश चव्हाण हे करीत आहेत.