जामनेर प्रतिनिधी । शहरातील पाचोरा रोडवरील बोहरा मंगल कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश विष्णू सैतवाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पत्रकारांची बैठक झाली. त्यात विचार विनिमय करून सर्वानुमते जामनेर तालुका पत्रकार असोसिएशनची स्थापना करण्यात येऊन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.
नुतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अमोल ईश्वर महाजन (तरुण भारत), उपाध्यक्ष – भानुदास बुधा चव्हाण (देशोन्नती), सचिव पंढरीनाथ नारायण पाटील (साईमत), सहसचिव सैय्यद लियाकत अली (लोकमत), खजिनदार सुनिल रघुनाथ नेरकर (पुण्यनगरी), सदस्य सुहास वामन चौधरी (दिव्य मराठी), प्रकाश विष्णू सैतवाल (देशदूत), सुरेश लक्ष्मण महाजन (सकाळ), रविंद्र रमेश झाल्टे (दिव्य मराठी), प्रल्हाद बळीराम सोनवणे (जनशक्ती) यांची एक मताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारणी मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी तोंडावर मास्क व सामाजिक अंतर ठेवून शहरासह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.