TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात सर्वच पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी ; प्रबळ उमेदवारांचा शोध सुरु !

जाणून घ्या...कोणत्या पक्षात नेमकं काय सुरु आणि नेते काय म्हणताय ?

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. धरणगावात राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया जोरात सुरु झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिंदे गटाकडून प्रबळ उमेदवाराचा शोध युद्ध पातळीवर सुरु असला तरी भविष्यात अपेक्षित तथा अनेपक्षित आघाड्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

पुढील महिन्यात होऊ घातलेल्या पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिंदे गटाकडून इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. यंदा पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असून त्यातून अंतिम उमेदवार निवडतांना वरिष्ठांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळी या बातमीतून जाणून घेऊ या…धरणगावातील राजकीय पक्षात नेमकं काय सुरु आहे आणि नेते काय म्हणताय?.

 

शिवसेनेकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरु

शिवसेनेकडून मुलाखतींद्वारे प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मागील दोन दिवसात शिवसनेचे बहुतांश उमेदवार निश्चित झाले असल्याचे कळतेय. एवढेच नव्हे तर, मॅरेथॉन पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखतीसह गावातील प्रत्येक प्रभागाचा आढावा घेण्यात आला आल्याचेही कळतेय. तर माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक विजय महाजन, वासुदेव चौधरी, भागवत चौधरी आणि राजेंद्र चौधरी हे  उमेदवारांची निवड प्रक्रियेत सहभागी आहेत. तसेच शिवसेना परत एकदा मोठ्या जोशात पालिका पुन्हा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागली असून उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. दरम्यान, राज्यातील घडामोडीनंतरही शिवसेनेने गावात बऱ्यापैकी ‘डॅमेज कंट्रोल’ केल्यामुळे शिवसेनेत जोश बघायला मिळत आहे.

 

शिंदे गटाकडूनही उमेदवारांची चाचपणी

राज्यातील सत्तांतरानंतर माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील अर्थात शिंदे गटाकडूनही उमेदवारांचा शोध सुरु आहे. आमच्याकडे इच्छुकांची गर्दी असली तरी त्यातून निवडून येणाऱ्या उमेदवारांचा निकष महत्वाचा आहे. गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढणार असून काही उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून गुलाबभाऊ मुंबईहून परत आल्यावर पुढील मुलाखती होतील, अशी माहिती असल्याची माहिती राजेंद्र महाजन यांनी दिली आहे. तर या प्रक्रियेट गटनेते पप्पू भावे, संजय चौधरी, विलास महाजन, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, माजी नगरसेवक अभिजित पाटील कार्यरत असल्याचेही राजेंद्र महाजन यांनी दिलीय. तर गुलाबराव पाटील यांचा गट पालिकेत सत्ता शाबूत ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावून निवडणूक लढेल, हे निश्चित आहे. तसेच गुलाबराव पाटील धरणगावात आल्यानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित

पालिकेच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने जवळपास उमेदवार निश्चित करून आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाय. भाजपने आजच्या घडीला सर्वच प्रभागात उमेदवार फायनल केले आहेत. राज्यातील राजकीय गणित बदलल्यामुळे कदाचित काही उमेदवार बदलतील. परंतू आजच्या घडीला भाजपचे सर्व उमेदवार कामाला लागले आहेत. भाजपकडून शिरीष बयस, चंद्रशेखर अत्तरदे, सुभाष पाटील, पी.सी. पाटील, अॅड. संजय महाजन, जिजाबराव पाटील,पालिकेतील गटनेते कैलास माळी, भूषण कंखरे दिलीप महाजन, कन्हैय्या रायपुर ही मंडळी उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेत आहेत. तर आमची २३ प्रभागातील उमेदवारांची यादी निश्चित झाली आहे. परंतू वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतरच  स्थानिक रणनीती ठरवली जाईल. तूर्त आमची तयारी पूर्ण झाली असून आम्ही निवडणुकीस सामोरे जाण्यास सज्ज असल्याची माहिती भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी दिली आहे.

 

राष्ट्रवादीकडून दमदार उमेदवार देण्याचा प्रयत्न

धरणगावात कधीकाळी सत्ताकेंद्रात प्रमुख असलेली राष्ट्रवादी यावेळी पुन्हा जोशात आली आहे. मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी सध्या जोशात आहे. तर राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून काही उमेदवार निश्चित झालेय. तर काही उमेदवार येत्या काही दिवसात निश्चित होतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली आहे. परंतू अंतिम निर्णय माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील हे घेतील असेही श्री. महाजन यांनी सांगितले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, मोहन पाटील, निलेश चौधरी, संभाजी कंखरे ही मंडळी पालिकेसाठी उमेदवार चाचपणी प्रक्रियेत काम करत आहेत.

 

कॉंग्रेस ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
कॉंग्रेसने धरणगाव पालिकेच्या दृष्टीने काही उमेदवार निश्चित केल्याचे कळतेय. कॉंग्रेसने मागील काही दिवसात विविध आंदोलन करून लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनामुळे कार्यकर्ते जोशात आहेत. आमचे काही उमेदवार निश्चित झाले असून पुढील काही दिवसात आणखी काही उमेदवार निश्चित होतील. परंतू तूर्त आम्ही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून अंतिम निर्णय डी.जी. पाटील साहेब घेतील, अशी माहिती तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी यांनी दिलीय. तर चंदन पाटील, महेश पवार, राजेंद्र न्ह्यायदे, सम्राट परिहार, सुरेश भागवत आदी मंडळी कॉंग्रेसचे उमेदवार ठरवणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

जळगावच्या मेहरून तलाव परिसरात दोन हजार वृक्षांचा मियावाकी प्रकल्प !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला आता फक्त उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत !

October 7, 2022

दीड लाखांची लाच भोवली ; अमळनेर तलाठी आणि मंडळ अधिकारीला अटक !

October 13, 2022

टीईटी घोटाळा ! बापरे महाराष्ट्रात ७,८८० बोगस शिक्षक

February 23, 2022

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २०६ कोरोनाबाधित !

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group