नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमित शाह यांना काल त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना १८ ऑगस्टला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केले होते. तर अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सध्या अमित शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मागील दीड महिन्यात तीन वेळा शाह यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागलेले आहे.या अगोदर १८ ऑगस्ट रोजी शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना ३१ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.