नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरात ‘तू करोडपती होणार’ असा फेक कॉल एका तरुणाला आला होता. परंतू मिळणाऱ्या पैशात हिस्सा देत नसल्यामुळे त्याच्या मित्रांनीच तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
यश ठाकरे, इम्तियाज अली, शेख असीम शेख रशीद हे तिघंही मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. यश ठाकरे याला त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला आणि ‘तू करोडपती बनणार’, असे त्याला त्या कॉलवर सांगितले. ही गोष्ट त्याने आपल्या मित्रांना सांगितली. मात्र, ‘आम्ही तुझ्या सोबत राहतो, मग तुला मिळणाऱ्या पैशात आम्हाला पण हिस्सा दे’, अशी मागणी केली. परंतू यशने ती मागणी फेटाळली. त्यानंतर रागाच्या भरात मित्रांनी यशला वाठोडा परिसरातील खुल्या मैदानात बोलावले. तिघांनी तेथे गांजाचे सेवन केले आणि नशेत इम्तियाज, शेख असीमने यशवर धारदार शस्त्रांनी हल्ला करत यशची हत्या केली. त्यानंतर त्या दोघांनी तेथून पळ काढला. परंतू दोघांना अटक केली आहे.