TheClearNews.Com
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकाचा बळी ; ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी !

ठेकेदाराच्या इंजिनिअरचा उर्मटपणा, म्हणे...खड्ड्यामुळे नव्हे तर चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बडगुजर गल्लीत पाईप लाईनसाठी काही दिवसापासून खोदून ठेवलेल्या रस्त्याने एका गरीब नागरिकाचा बळी घेल्याची हृदयद्रावक घटना आज पहाटे घडली. संतापजनक म्हणजे याबाबत ठेकेदाराच्या इंजिनिअरला फोन केला असता, त्याने खड्ड्यामुळे नव्हे तर चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगत उर्मटपणा केला. दरम्यान, संबधित ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांसह समाज बांधवांनी केली आहे.

धरणगाव शहरातील मोठा माळी वाडा लगत असलेल्या बडगुजर गल्लीत मागील तीन-चार दिवसापासून पाण्याच्या पाईप लाईनसाठी रस्ता खोदून ठेवलेला आहे. आज पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान संजय रतन बडगुजर (वय-52) हे नेहमी प्रमाणे शौचास जाण्यासाठी घरातून निघाले. खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे आजूबाजूला असलेल्या दगडावरून बडगुजर यांचा पाय घसरला आणि थेट खड्ड्यात जाऊन पडले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

घटनेची माहिती मिळताच माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी ठेकेदारला जाब विचारण्यासाठी फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर चौधरी यांनी ठेकेदाराच्या इंजिनिअरला फोन लावला असता त्याने खड्ड्यामुळे नव्हे तर चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे उर्मट भाषेत उत्तर दिले. दरम्यान, संजय बडगुजर यांच्या कुटुंबाची आर्थिकस्थिती हलाकीची आहे. रांगोळी विकून आणि जे मिळेल ते काम करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. त्यामुळे त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी देखील खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक कशा पद्धतीने दुचाकी घसरून पडताय, याचे व्हिडीओ धरणगावच्या सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

संबंधित परिवार अत्यंत गरीब आहे. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यामुळे परिवारावर मोठा आघात झाला आहे. त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे किंवा ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

– वासुदेव बडगुजर (बडगुजर समाज अध्यक्ष, धरणगाव)

 

मी ठेकेदारला फोन केला होता. परंतू त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे मी ठेकेदाराच्या इंजिनिअरला फोन केला. त्याने खड्ड्यामुळे नव्हे तर चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. संजय बडगुजर यांचा परिवार अत्यंत गरीब आहे. धरणगाव नागरिक तर मदत करतीलच. परंतू त्यांना ठेकदारकडूनही आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. अन्यथा ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्याची आमची आक्रमक भूमिका राहील.

-नगराध्यक्ष निलेश चौधरी (माजी लोकनियुक्त, धरणगाव)

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
Next Post

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने विवेक ठाकरे यांचा पुण्यात गौरव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १० चिमुरड्यांना विषबाधा ; अमळनेर तालुक्यातील घटना !

October 5, 2023

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

September 16, 2022

…तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल – अमेय खोपकरांचा इशारा

September 22, 2020

मुंदखेडे येथील आदिवासी भिल्ल वस्ती झाली प्रकाशमान !

February 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group