जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खंडेराव नगरातील गाय चोरी प्रकरणी राममंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंचल काशिनाथ मानकुंमरे यांच्या मालकीची ५० हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी ९ सप्टेंबरच्या रात्री घरासमोरून अज्ञात चोरून नेली होती. तसेच त्याच रात्री पिंप्राळा हुडको परिसरातूनही आणखी एकाची गाय चोरीला गेल्याचे चंचल यांनी सांगितले होते. गेल्या दोन दिवसांपुर्वी गुरांची चोरून चोरटी वाहतूक करून पाळधी येथील कत्तलखान्यावर नेत असल्याची माहिती जिल्हा पोलीसांना मिळाली होती. त्यावेळी पोलीसांनी पाळधी येथील कत्तलखान्यावर धाड टाकून सुमारे २२ गुरांची सुटका केली होती. या सुटका केलेल्या गायींमध्ये चंचल मानकुंमरे यांची देखील गाय होती. दरम्यान, याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.