जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आढावा बैठकीसाठी आले होते. आम्हाला वेळ देऊन देखील भेट न घेता ना. सावंत निघून जात होते. यावेळी आम्ही त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप करत विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या वाहनासमोर विद्यापीठात ठिय्या आंदोलन सुरु केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
धुळे येथे विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुषपणे पालकमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या समोर मारहाण करण्यात आल्यामुळे राज्यभर आंदोलन झाली होती. विद्यार्थ्यांना मारहाणी पुरानावृत्ती जळगावातही आज झाली. विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितली की, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आढावा बैठकीसाठी येणार असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे विद्यार्थ्याच्या विविध मागण्या आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. परंतू आम्हाला वेळ देऊन देखील भेट न घेता ना. सावंत विद्यापीठातून निघून जात होते. यावेळी आम्ही त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आमच्या सोबत अमानुष व्यवहार केला. आम्हाला मारहाण केल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन सुरु केले. तसेच महिला कार्यकर्त्यांसोबत अभद्र व्यवहार केल्याचा विद्यार्थ्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ना. उदय सामंत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.