TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात थिएटर प्रीमियर लीग २०२०चे आयोजन; महाराष्ट्रातील चार नाट्यसंस्थांचा सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2020
in जळगाव, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात सर्व लोक घरात बंदिस्त आहेत. कलावंत व रसिक यांचे नातं मात्र कायम आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमी ही एक प्रयोगशील रंगभूमी म्हणून देशभर ओळखली जाते. या लॉकडाऊन काळात रंगभूमीवर नाटकांचे सादरीकरण थांबलं असलं तरी कलावंतांच्या मनातील नाटक मात्र त्यांना अस्वस्थ करत आहे. आज लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात शिथील होत असल्या तरी नाट्यगृह बंदच राहणार आहेत. या काळात आपल्या आसपासच्या साधनांचा उपयोग करीत नवी वाट शोधण्याचा प्रयत्न कलावंत करीत आहेत. यातीलच एक नवा ऑनलाइन नाट्य महोत्सव आयोजित होत आहे. यातच परिवर्तनच्या नली नाटकाची निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील महत्वाच्या नाट्यसंस्थाचा सहभाग असलेल्या थिएटर प्रीमियर लीग २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यगृहात जाऊन नाटक पाहणे आज तरी रसिकांना शक्य नसल्याने घरी बसल्या बसल्या ऑनलाइन पद्धतीने या ‘थिएटर प्रीमिअर लीग २०२०’ मधील नाटकांचा आनंद रसिक घेऊ शकणार आहेत. थिएटर प्रीमियर लीग या अभिनव संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे काम अभिनेते, दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. या थिएटर प्रीमियर लीगचे आयोजन दि २४, २५, २६ व २७ सप्टेंबर २०२० ला होणार आहे. या प्रीमियर लीगमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील संस्थां सहभागी होत असून होणार असून यात कल्याण येथील अभिनय, कल्याण. रत्नागिरी येथील कलांश थियटर. जळगाव येथील परिवर्तन, जळगाव आणि मुंबई येथील प्रयोग, मालाड अशा चार संस्था सहभागी होत आहेत.

READ ALSO

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

नाटक हा जिवंत कलाप्रकार असून या थिएटर प्रीमियर लीगच्या माध्यमातून जगभरातील मराठी रसिक एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने या लीगमधील नाटके बघू शकणार आहेत. जळगावच्या परिवर्तन संस्थेचे श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारीत शंभू पाटील यांनी नाट्य रूपांतरित केलेलं आणि योगेश पाटील दिग्दर्शित हर्षल पाटील अभिनीत ‘नली’ एकलनाट्याचे सादरीकरण या थिएटर प्रीमियर लिग मध्ये होणार आहे. ‘नली’ एकलनाट्याचे आतापर्यंत ४३ प्रयोग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात झालेले आहेत. या महोत्सवात सतीश तांबे यांच्या रमायाबिन कथेवर आधारीत अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘परमेश्वरी पाहुणा’, इरफान मुजावर लिखित मनोज भिसे दिग्दर्शित ‘अजूनही चांदरात आहे’ आणि प्रदीप राणे लिखित प्रमोद शेलार दिग्दर्शित श इज बर्निंग या चार नाटकांचा समावेश या महोत्सव होत असून यात महाराष्ट्रातील ही उत्तम नाटके दररोज रात्री ८ वाजता सादर होणार आहेत. तिकीट विक्री १० सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तिकीट दर प्रती नाटक ५५ रूपये आणि पुर्णोत्सव तिकीट दर १६० रुपये असेल. थिएटर प्रीमियर लीग २०२० द्वारे अशा प्रकारचा ऑनलाइन नाट्य महोत्सव महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून रसिकांसाठी ही पर्वणीच आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
Next Post

लवकरच भुसावळ येथील कारागृहाचा प्रश्न मार्गी लावणार - पालकमंत्रींचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वैद्यकीय अधीक्षकास ४८ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक !

December 24, 2023

चिंता वाढली : जिल्ह्यात आज आढळले ९ कोरोनाबाधित !

December 30, 2021

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा : चौकशी पथकाला सलग तिसऱ्यांदा आढळले घराच्या ठिकाणी रिकामे प्लॉट !

December 4, 2020

फोनवर बोलण्याच्या नादात धबधब्यात पडला ; श्रीरामपूरातील तरुणाचा मृत्यू !

August 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group