मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दुबईहून दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
दाऊद इब्राहिमच्या हस्तकाचा मातोश्रीवर तीन ते चार फोन आल्याची माहिती समोर आली आहे. धमकीच्या या फोननंतर मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत.