TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिड कोटींच्या दरोड्यात फैजपूरातून चोरलेल्या वाहनांचा वापर ; परफेक्ट टीप अन् सिनेस्टाईल थरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चारचाकी वाहनातून तोंडाला मास्क बांधून आलेल्या तिघा दरोडेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून व तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल एक कोटी 60 लाख रुपयांची रोकड लांबवल्याची सिनेस्टाईल घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ शनिवार, 17 रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा पडलेल्या दरोड्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले वाहन हे फैजपूर येथून चोरल्याचे स्पष्ट असून दरोडेखोरांना परफेक्ट टीमप मिळताच त्यांनी पाळत ठेवून नियोजनबद्धरीत्या दरोडा टाकल्याचे स्पष्ट आहे.

सिनेस्टाईल एक कोटी 60 लाख लूटले
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंग आहे. शनिवारी शेतकर्‍यांना कापसाचे पेमेंट करावयाचे असल्याने जळगाव येथील अ‍ॅक्सीस बँकेतून एक कोटी 60 लाखांची रोकड जिनिंग कर्मचारी योगेश पाटील, लेखापाल दीपक महाजन व चालक उमेश पाटील यांनी यांनी काढल्यानंतर क्रेटा कारने पिंप्री येथे येण्यासाठी प्रवास सुरू केल्यानंतर शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मुसळी फाट्याजवळील निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाखाली लाल रंगाच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली व काही क्षणातच स्कॉर्पिओतून तोंडाला मास्क लावलेले 30 ते 35 वयोगटातील तीन संशयित उतरले व त्यांनी दुर्गेश जिनिंगच्या क्रेटा वाहनाच्या काचा फोडून योगेश पाटील, लेखापाल दीपक महाजन व चालक उमेश पाटील यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याने तिघे प्रचंड हादरले व काही क्षणात तिघा दरोडेखोरांनी वाहनाच्या डिक्कीतील कापडी पिशव्यांमध्ये असलेली एक कोटी 60 लाखांची रोकड लूटली. यावेळी स्कॉर्पिओ वाहन सुरू न झाल्याने त्यांनी अन्य इको वाहनाने ठोकली. घटनास्थळापासून काही अंतरावर इको वाहनही सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

READ ALSO

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

रेकी करून टाकला दरोडा
दरोडेखोरांनी आणलेली स्कॉर्पिओ कार क्रेटा वाहनाला धडक बसल्यामुळे सुरू झाली नाही तर धक्का देवूनही उपयोग न झाल्याने दरोडेखोरांनी प्लॅन बी प्रमाणे अन्य इको वाहनही घटनास्थळी बोलावून ठेवल्याचे स्पष्ट आहे. याच वाहनातून काही अंतरापर्यंत दरोडेखोरांनी प्रवास केला. दरोडेखोरांनी पूर्ण नियोजनबद्धरीत्या रेकी करून हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट आहे. चाळीसगावच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, धरणगाव पोलिस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

फैजपूरातील वाहनांचा दरोड्यासाठी वापर
खास सूत्रांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यासाठी फैजपूर येथून स्कॉर्पिओ व इको वाहन शुक्रवार, 16 रोजी चोरले व अत्यंत नियोजनबद्धरीत्या शनिवारी दरोडा टाकला. सुरूवातीला स्कॉर्पिओतून आलेल्या दरोडेखोरांनी तक्रारदारांच्या वाहनाला धडक दिली व स्कॉर्पिओ तेथून टाकून दरोडेखोर इकोतून पसार झाले मात्र काही अंतरावर ही इको सापडली असून अन्य वाहनाने सराईत दरोडेखोर पसार झाले.

दरम्यान, फैजपूर येथील शिक्षक दिनेश भानुदास किरंगे यांच्या मालकिची पांढर्‍या रंगाची इको (एम.एच.19 एएक्स.0796) व फैजपूर येथीलच शेख अनिस शेख सत्तार यांच्या स्कॉर्पिओ (एम.एच.41-0999) ही शुक्रवारी चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच दोन वाहनांचा दरोड्यासाठी वापर झाला असून दरोड्यानंतर दोन्ही वाहने घटनास्थळाजवळून जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
Next Post

ऋषिकेश चौधरीची महाराष्ट्र शासनाच्या विदेश शिष्यवृत्तीसाठी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात ७ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम लागू

May 25, 2021

शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित !

March 14, 2021

चोपडा तालुक्यातील काही भागात गारपीटसह अवकाळी पावसाची हजेरी !

April 13, 2025

नाडगाव येथील १९ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या !

November 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group