TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील बोगस आणि नियमबाह्य कामे प्रकरण : १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in जिल्हा प्रशासन, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी)  शहरात सुरु असलेले पेव्हर ब्लॉक, बेलदार मोहल्लाजवळील संडास बांधकाम आणि झुमकराम वाचनालयाचे काम बोगस आणि नियमबाह्य होत असल्यामुळे त्यांची बिले काढण्यात येऊ नये. तसेच सर्व कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: चौकशी करावी, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी एका तक्रारी अर्जाद्वारे केली होती. दरम्यान, या तक्रारी अर्जाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने धरणगाव मुख्याधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

 

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हाधिकारी कार्यालय (नगर विकास शाखा) च्या पत्रावर सतीश दिघे (सहायक आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय) यांच्या स्वाक्षरीचे धरणगाव मुख्याधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, संडास बांधकाम आणि झुमकराम वाचनालयाचे काम बोगस आणि नियमबाहय होत असल्यामुळे बिले न काढण्याबाबत अँड. संजय महाजन (भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष जळगाव) यांचा तक्रारी अर्ज कार्यालयास प्राप्त झालेला आहे. तरी सदर अर्जातील तक्रारीच्या अनुषंगाने आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल १५ दिवसात या कार्यालयास सादर करावा. यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या पत्राची एक प्रत तक्रारदार अॅड. संजय महाजन यांना देखील प्राप्त झाली आहे.

 


काय होती अॅड. संजय महाजन यांची तक्रार ?

 

धरणगाव शहरातील विविध भागात पेव्हर ब्लॉकची कामे चालू आहेत. या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. तसेच शहरातील प्रास्ताविक भुयारी गटारी आणि पाईप लाईनची कामे लक्षात घेता पेव्हर ब्लॉकवरील खर्च म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. वास्तविक बघता धरणगाव मुख्याधिकारी यांनी देखील २ फेब्रुवारीला झालेल्या सभेच्या टिप्पणीत पेव्हर ब्लॉक बसवताना आणि काँक्रीटीकरण करतांना निधीचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं कायदेशीर मत नमूद केलं आहे. त्यामुळे आपण याबाबत तत्काळ ३०८ प्रमाणे ठराव रद्द करण्यासाठी धरणगाव मुख्याधिकारी यांना आदेश द्यावेत. तसेच याबाबत जिल्हाधिकारी म्हणून आपण कायदेशीर आदेश देत नाही, तोपर्यंत धरणगातील शहरातील पेव्हर ब्लॉकची ठेकेदाराची बिले काढू नयेत.

 

तसेच धरणगाव शहरातील बेलदार मोहल्लाजवळील संडास बांधकाम मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. इस्टीमेट प्रमाणे काम होत नसून बांधकामचे साहित्य नित्कृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे या संडासच्या बांधकामाची आपण प्रत्यक्ष तसेच तक्रारदार म्हणून आमच्या समक्ष थर्डपार्टी ऑडीटर, पालिकेचे इंजिनिअर यांना आदेश देवून कामाची तात्काळ पाहणी करावी. जोपर्यंत थर्डपार्टी ऑडीटर आणि पालिकेचे इंजिनिअर येऊन पाहणी करत नाही. तसेच आपण अहवाल देत नाहीत. तोपर्यंत हे बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही थर्डपार्टी ऑडीट करतांना तक्रारदार म्हणून आम्हास समक्ष बोलावून आमच्या शंकेचे निरसन करूनच बिल अदा करण्यात यावे.

 

शहरातील झुमकराम वाचनालयाचे काम बोगस होत आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाची दिशाभूल करून जागा पलीकडे वर्ग करण्यात आली आहे. झुमकराम सार्वजनिक वाचनालयाला परवानगी देतांना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अटी-शर्थीच्या अधीन राहून परवानगी दिली होती. त्यातील पहिल्याच अटीचे उल्लंघन झाले आहे. त्यानुसार जागेचा वापर फक्त वाचनालयासाठी करण्याची अट तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी घातली होती. त्यामुळे वाचनालयासोबत शॉपिंग कॉप्लेक्स कसे बांधले जातेय?, हा प्रश्न जनतेला पडला आहे.

 

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी २७ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या आदेशात नुसार पालिकेकडून आलेल्या अ.क्र. 4 वरील पत्रान्वये मुख्याधिकारी नगर परिषद धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव यांनी दिनांक २४ जानेवारी २०१८ चे पत्रान्वये धरणगाव नगरपालिका हद्दीतील सरकारी जागा सिसनं. ३२६६,३२८२/अ/1. ३२८३/ब, ३२८४, ३२८५ ही झुमकराम वाचनालयाच्या लायब्ररीसाठी आरक्षित असलेली जागा नगरपालिका धरणगावकडे वर्ग होणेबाबतचा प्रस्ताव कार्यालयास विनंती केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विविध अटी शर्थीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती. परंतू जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून वाचनालयासोबत व्यापारी संकुल देखील बांधले जात आहे. त्यामुळे वाचनालयाचा मूळ हेतूच नष्ट होत आहे. तसेच या ठिकाणी बांधकाम करताना संत सावता माळी आणि दलित समाजाच्या पंच मंडळाची जागा बेकायदेशीरपणे वर्ग करून तत्कालीन जिल्हाधिकारी पर्यायी शासनाची फसवून केली आहे. तसेच यामुळे एका शिक्षण संस्थेसह दलित समाजावर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे झुमकराम वाचनालयाचे काम तात्काळ थांबवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत सविस्तर माहिती मागवून निर्णय घ्यावा. तसेच ठेकेदाराचे सर्व बिले तात्काळ थांबविण्यात यावीत, असे अॅड. संजय महाजन यांनी तक्रारी अर्जात म्हटले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
Next Post

'ट्रोलर्सची नजर नको तिथे होती' ; हेमांगीला ट्रोल करणाऱ्यांवर चित्रा वाघ संतापल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, एका पायलटचा मृत्यू

January 26, 2021

बालगंधर्व संगीत महोत्सवाची आजपासून द्वितपपूर्ती वारी स्वरोत्सवाची..

January 9, 2026

रस्ता बंद, उपचारासाठी पतीने पत्नीला खांद्यावर उचलले, पण…!

September 8, 2021

पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group