TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘ट्रोलर्सची नजर नको तिथे होती’ ; हेमांगीला ट्रोल करणाऱ्यांवर चित्रा वाघ संतापल्या

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in मनोरंजन, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिने ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही फेसबुक पोस्ट लिहिली. ज्यामुळे तिची सध्या चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हेमांगीला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. हेमांगीने शेअर केलेल्या त्या व्हिडीओमध्ये ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, त्यावर अनेक घाणेरड्या कमेंट्स आल्या आहेत, याकडे चित्रा वाघ यांनी लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुकवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते आहे. हेमांगी कवीच्या पोस्टवर काही सेलिब्रेटींनी कमेंट करत तिच्या मताला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, नुकतेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी किती दिवस आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत, तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. हेमांगीने शेअर केलेल्या पोळ्या लाटण्याच्या व्हिडीओमध्ये ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, त्यावर इतक्या घाणेरड्या कमेंट्स आल्या, त्याबद्दल चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

चित्रा वाघ म्हणाल्या की, ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?

त्या पुढे म्हणाल्या की, एक अतिशय साधा पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ हेमांगीने शेअर केला होता. त्यावर इतक्या वाईट कमेंट्स आल्या. लोकांची जी नजर आहे, ती सुधारण्याचे काही नावच घेत नाही. इंस्टाग्राम हे एक मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म आहे. त्यावर वेगवेगळे विषय घेऊन ती येत असते. त्या पोळ्या लाटण्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन, त्याच्यावर नजर न टाकता, नको त्या गोष्टींवर बारकाईने पाहणे, त्यावर अश्लील लिहिणे, म्हणजे लोकांनी सगळ्या पातळ्या गाठलेल्या आहेत, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : कापसेकडून पुन्हा घरपोच पैसे परत ; जळगावच्या ११ ठेवीदारांचा समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ढूंढते रह जाओगे’ मात्र, महाराष्ट्र वाकणार नाही ; संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका !

February 27, 2022

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026

जामनेरच्या कार्यक्रमाला जाणार नाही : ना. गुलाबराव पाटील

October 12, 2020

किनगाव येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी सुनेसह दोघे अटकेत !

March 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group