TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव वाळू माफिया प्रकरण : महसूलमंत्र्यांशी बोलून सर्व वस्तुस्थिती सांगणार : डी.जी.पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in गुन्हे, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आमच्या कार्यकर्त्याने कोणतीही खंडणी मागितलेली नाही. तसा कोणताही परिस्थितीजन्य पुरावा देखील नाहीय. याबाबत आज मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार असून त्यांना आज बोलून सर्व वस्तुस्थिती सांगणार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.

 

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

डी.जी पाटील पुढे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्याने कोणतीही खंडणी मागितलेली नाही. तहसीलदार यांचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. मी त्यांच्याशी देखील संपर्क साधून म्हणणं जाणून घेईल. खंडणीच्या गुन्ह्यासाठी सक्षम पुरावे लागतात. आमचा कार्यकर्ता चुकला असला तर आम्ही पाठीशी घालणार नाही. परंतू आमच्या कार्यकर्त्याने कोणतीही खंडणी मागितलेली नाही, त्यामुळे याबाबत आज मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार आहे. दरम्यान, कुणी अधिकाऱ्याच्या दालनात घुसून खंडणी मागेल, अशी उत्तर प्रदेश, बिहार सारखी परिस्थिती महाराष्ट्रात नाहीय, असेही श्री. पाटील म्हणाले.

 

काय आहे प्रकरण

तालुक्यासह शहरातील अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या आशयाची तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी केली होती. परंतू तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तक्रारदार रामचंद्र माळी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. मागील काही दिवसापासून सोशल मीडियात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफियांविरुद्ध कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी सोशल मिडीयाच्या माधमातून आवाज उठविला होता. याचसंदर्भात मंगळवारी रामचंद्र माळी ही तक्रार देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे गेले. परंतू तहसिलदारांनी अरे तुरेचे भाषा करत त्यांना हाकलून लावल्याचा आरोप रामचंद्र माळी यांनी केला होता. एवढेच नव्हे तर रामचंद्र माळी यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे फोनवरून तहसीलदार यांनी हाकलून लावले व पोलिसांची धमकी दिली, अशी तक्रार केली होती. त्यावर अभिजित राऊत यांनी मला तक्रार पाठवा मी कारवाई करायला सांगतो असे आश्वासन दिले. हीच तक्रार रामचंद्र माळी प्रांतधिकारी विनय गोसावी यांना व्हाटसअपला पाठवली. एवढेच नव्हे तर यासंदर्भात पुरावा म्हणून माळी यांनी पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेची ऑडीओ क्लिप, तक्रार पाठविल्याचे स्क्रीन शॉट, प्रांतअधिकाऱ्यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीचे स्क्रीन शॉट पाठवले. याबाबत त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही मेलवरून तक्रार केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
Next Post

बिहारच्या भागलपूरमध्ये नाव पलटली, 5 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानात बलात्काराच्या दोषी व्यक्तीला नपुंसक बनवणार ; नवीन कायद्याला मंजुरी !

December 16, 2020

5 हजारांची लाच घेणारे मनपातील लाचखोर लिपीकांना एसीबीने पकडले रंगेहाथ !

August 20, 2025

नवरात्रोत्सवासाठीही गृह विभागाकडून नियमावली जाहीर ; दांडिया किंवा गरब्याच्या आयोजनावर बंदी

September 29, 2020

चाळीसगाव : सर्पमित्र मयूर कदमने पकडला विषारी घोणस साप !

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group