नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या एका पत्रकारासह दोघांना अटक केली आहे. राजीव शर्मा असे अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. तर अन्य दोघं आरोपी चीन आणि नेपाळचे रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने फ्रिलान्सर पत्रकार राजीव शर्माला अटक केली आहे, त्याच्यावर तो चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे. पत्रकाराशिवाय पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषाला देखील अटक केली आहे. यापैकी एक महिला चीनची असून दुसरा पुरुष नेपाळचा असल्याचे वृत्त आहे. पत्रकार राजीव शर्माला पितामपुरा येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी राजीवकडून चीनशी संबंधित काही गुप्त कागदपत्रासह संरक्षण संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांना गोपनीयता कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.