नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या तुलनेत चीनची सैन्य ताकद आधिक आहे. भारत आणि चीन दोन्ही महाशक्ती देश आहेत. पण, जर युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. सीमा युद्ध सुरु झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नाही, अशा शब्दात चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तमानपत्राने भारताली धमकी दिली आहे.
शनिवारी ग्लोबल टाइम्समध्ये चीनच्या ताकदीची भारताला आठवण करुन देतोय. त्यामध्ये सैन्याच्या ताकदीचीही समावेश आहे. भारताच्या तुलनेत चीनची सैन्य ताकद आधिक आहे. भारत आणि चीन दोन्ही महाशक्ती देश आहेत. पण, जर युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. सीमा युद्ध सुरु झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच चीनकडून दुहेरी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. एकीकडे चीन शांतता दाखवत आहे तर दुसरीकडे सरकारी प्रसारमाध्यमे युद्धाबाबत बातम्या देऊन भडकावण्याचा प्रयत्न करत आहे.