कोटा (वृत्तसंस्था) राजस्थानच्या चंबळ नदीत ३० जणांसह बोट बुडाल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण बेपत्ता अद्यापही बेपत्ता आहेत. गोठला कलाच्याजवळ कमलेश्वर धामला जात असताना ही घटना झाली.
राजस्थानच्या बुंदीच्या चंदा खुर्दच्या चंबळ नदीमध्ये बोट बुडून अपघात झाला. या घटनेत २५-३० जण बुडाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरित जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान, अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.