चोपडा (प्रतिनिधी) केंद्र सरकारने कृषी विषयक तीन विधेयके विना चर्चा बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली. सदरची विधेयके ही शेतकरी हिताची नसून शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहेत. त्यामुळे सदरची विधेयके त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत आली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनचा इशारा देखील देण्यात आला आहे.
कृषी विषयक विधेयके मंजूर करताना कायद्याच्या विरोधात मंजूर करून घेतली. शेतकरी विरोधात ही विधेयके असल्याने काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. शेतकरी हीत हे काँग्रेसचे ब्रीद आहे. सदरची विधेयके त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार सय्यद साहेब यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष सुरेश सिताराम पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील, शहर अध्यक्ष के. डी. चौधरी, ऊपाध्यक्ष हाजी महेमूदअली सैय्यद, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत शांताराम साळुंखे, मार्केट कमिटीचे माजी ऊपाध्यक्ष नंदकिशोर चिंधू साळुंखे, एन. एस. यू. आय. अध्यक्ष चेतन पंढरीनाथ बाविस्कर, शिक्षक सेलचे अध्यक्ष मंगेश रमेश भोईटे, सुनिल हिंमत पाटील, अमजदखान रऊफखान कुरेशी, सूर्यकांत के. चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.