मुंबई (वृत्तसंस्था) आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीने खाली कोसळेल. ते कोसळेल तेव्हा आम्ही बघू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर दिली आहे.
संजय राऊत यांच्यासोबच्या बैठकीबद्दल आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत यांना ‘सामना’साठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी ही बैठक झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत यांना सामनासाठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यांनी त्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. त्यावर मी जरूर मुलाखत देईन असं त्यांना म्हटलं. पण माझ्या काही अटी, शर्ती आहेत. मुलाखत घेताना तिथे माझाही कॅमेरा असेल, अशा माझ्या काही अटी, शर्टी आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकदा भेटून बोलू असे ठरले होते. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो घेतो,’ असे फडणवीस म्हणाले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत भाजपची कोणतीही चर्चा नाही. कोणतं कारणंही नाही. सध्या सरकारचे ज्या पद्धतीने काम सुरु आहे त्यामुळे लोकांमध्ये खूप आक्रोश आहे. विरोध पक्ष आम्ही सरकारला जे चुकतंय यावरुन धारेवर धरतोय. मला विश्वास आहे की आपल्या कृतीने खाली कोसळेल. ते कोसळेल तेव्हा आम्ही बघू. आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.