TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाथरसच्या पीडितेला तात्काळ न्याय द्या ; बहुजन क्रांती मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in गुन्हे, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) हाथरस येथील पिडीत तरुणीवर झालेला अत्याचार व जीवे ठार मारल्याप्रकरणी समस्त बहुजन बांधवांच्या भावना दुखावल्या असून खरे गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेवून कडक कारवाई करावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याबाबत निवेदन तहसिल कार्यालय व धरणगाव पोलिसांना देण्यात आले.

 

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

निवेदनात म्हटले आहे की, हाथरस जिल्हा अलिगढ ( उत्तरप्रदेश ) येथील अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी, तिची आई व मोठा भाऊ गवत कापण्यासाठी जंगलात गेले होते. गवताचा भारा घेऊन मोठा भाऊ निघून गेला. आई गवत कापत होती व पिडीत मनिषा गवत गोळा करत होती. मनिषाची आई तिच्या कामात व्यस्त आहे हे लक्षात घेऊन चार नराधमांनी १९ वर्षीय पीडित मनिषाला तिच्या गळ्यातील ओढणीच्या सहाय्याने बाजरीच्या शेतात ओढत नेले व तिच्या शरीराचे लचके तोडत सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर पीडित तरुणीने तिच्यावर झालेला अत्याचार कोणाला सांगू नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली, पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून तिच्या पाठीचा कणा मोडून टाकला. पीडितेवर झालेल्या अन्यायाची दखल पोलिसांनी घेतली नाही उलट ही तरुणी ढोंग करतेय असं सांगून त्यांना धुत्कारून देण्यात आलं. पीडित तरुणी १५ दिवसांपर्यंत सफदरजंगच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत राहिली अखेर २९ सप्टेंबर २०२० रोजी तिची झुंज अपयशी ठरली व तिने प्राण सोडले. एवढ्यावरच हा अन्याय संपला नाही तर पीडितेचे मृत शरीर तिचे आई – वडील आणि नातेवाईक मागत असतांना देखील ते त्यांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

भारतातील बहुधा ही पहिलीच घटना असेल. एकीकडे ‘महिला सुरक्षा’ , ‘बेटी बचाव – बेटी पढाव’ च्या मोठमोठ्या पोकळ वल्गना करणाऱ्या भाजपचे सरकार उत्तरप्रदेश मध्ये असतांना जर अशी घटना घडत असेल , एवढ्या दिवसापर्यंत मीडियावर याची बातमी येत नसेल तर याला नेमकं जबाबदार कोण? या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा भावना भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहनराव शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील व माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी यांनी व्यक्त केल्या. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी , अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसिलदार नितिनकुमार देवरे , नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ , एपीआय गणेश अहिरे व गुंजाळ साहेब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहनराव शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील , माळी समाजाचे कोषाध्यक्ष विनोद माळी , बामसेफ तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी , राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी , शहराध्यक्ष गोरखभाऊ देशमुख , भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पवार , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , भोई समाजाचे पंच जिवन भोई , शहराध्यक्ष नगर मोमीन, करीम लाला , भारत मुक्ती मोर्चाचे गौतम गजरे , विक्रम वाघमारे , आकाश बिवाल सर , आनंद पाटील , माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते ओंकार माळी , अमोल सोनार , मयूर भामरे , दिपक सोनवणे , अमोल देशमुख , सिद्धांत वाघरे , सागर पचेरवार , एकलव्य (नाईक) समाजाचे अध्यक्ष , बापूसाहेब मोरे , वामनराव नाईक , ह.भ.प. गोपाळ महाराज यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर अनिल देशमुखांचा योगींना सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात आज मरी माता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा !

December 25, 2022

जगण्याची आशा संपली अन् एकमेकांच्या कवेत घेतला निरोप

October 26, 2022

विटनेर येथे कारची दुचाकीस्वारला जोरदार धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार

December 10, 2020

महावितरण प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर उर्जद्वारे विजपुरवठा करणार !

August 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group