
जळगाव (प्रतिनिधी) – उधार दारु देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने चौघांनी वाईन शॉपमधील मॅनेजर मंगल बाळू सुरळकर (वय २८, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्यासोबत तिघ कर्मचारी घरी जात असतांना रस्त्यात अडविले. त्यानंतर लाकडी दांडक्यासह दगड विटांनी मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता महामार्गावरील वासूकमल सोसायटीजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गुजराल पेट्रोल पंप शेजारी असलेल्या एन. एन. वाईन शॉपवर मंगल सुरळकर हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नेहमी प्रमाणे वाईन शॉप उघडले. यावेळी त्यांच्यासोबत अमोल कोळी, योगेश झाल्टे, ज्ञानेश्वर जाधव हे तिघे होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानावर पद्माकर कोळी हा त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांसोबत आला. त्याने मॅनेजर सुरळकर यांना उधार दारु मागितली. परंतू सुरळकर यांनी त्यांना दारु देण्यास नकार देत रोख पैसे घेवून दारु घेवून जा असे सांगितले. पद्माकर कोळी यास राग आल्याने ते शिवीगाळ करीत तेथून निघून गेले.
रस्त्याने अडवित केला हल्ला
नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजेच्या सुमारास मंगल सुरळकर हे दुकान बंद करुन घरी जाण्यासाठी निघाले. महामार्गावरील वासू कमल सोसायटी समोर संशयित पद्माकर कोळीसह त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनी अडवून शिवीगाळ करीत लाकडी काठीने व दगडांनी मारहाण करीत जखमी केले.
स्वतःची सुटका केल्यानंतर दिली पोलिसात तक्रार
अचानक मारहाण होत असल्याने चौघे जण हे पळत सुटका केली. त्यानंतर मालकांना घटनेची माहिती दिल्यानंतर मंगल सुरळकर यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित पद्माकर कोळी (रा. बांभोरी, ता. धरणगाव) व त्याचे साथीदार मनिष साळवे, लिलाधर व निरज नामक संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















